घरमहाराष्ट्रनाशिकहेल्मेटमुळे मणक्याचे विकार, हा गैरसमज!

हेल्मेटमुळे मणक्याचे विकार, हा गैरसमज!

Subscribe

हेल्मेट सुरक्षा : ‘आपलं महानगर’तर्फे वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधला असता हेल्मेटमुळे मणक्याचे विकार होतात, हा गैरसमज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक शहरातील वाढते अपघात आटोक्यात यावेत, यासाठी नाशिक पोलिसांतर्फे सोमवार (दि.१३) पासून हेल्मेट मोहीम सुरू करण्यात आली आहे. हेल्मेट सक्तीमुळे सोशल मीडियातून अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. हेल्मेट सुरक्षेसाठी फायदेशीर नसून त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात, असा गैरसमज अनेकांकडून पसरवला जात आहे. यासंदर्भात ‘आपलं महानगर’तर्फे वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधला असता हेल्मेटमुळे मणक्याचे विकार होतात, हा गैरसमज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

शहरात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ६३ वाहनचालकांचा बेशिस्त, भरधाव वेगामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. शहरातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी सोमवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखा व सर्व पोलीस ठाणे मिळून हेल्मेट न वापरणार्‍यांवर संयुक्त कारवाईची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील ५२० पोलीस व ५२ अधिकारी विना हेल्मेट व विना सीटबेल्ट वाहनचालकांवर करीत आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या कारवाईपासून दूर राहण्यासाठी अनेक वाहनचालक नवनवीन कल्पना अंमलात आणत आहेत. हेल्मेट वापरामुळे डोक्यावरील केस गळतात, डोकेदुखीचा त्रास होतो, हेल्मेट परिधान केल्यास उजव्या व डाव्या बाजूचे दिसत नाही, हेल्मेटमुळे मणक्याचे विकार होतात, हेल्मेटमुळे डोके जड वाटते. प्रत्यक्षात असा कोणताही त्रास होत नाही, असे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र पाटील यांनी सांगितले. हेल्मेट सुरक्षेसाठी गरजेचे आहे. प्रत्येकाने दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान केलेच पाहिजे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

नियमित हेल्मेट वापरा

हेल्मेट हे नाशिककरांच्या सुरक्षेसाठी असून फायदेशीर आहे. हेल्मेटमुळे केस गळत नाही, मणक्याचे विकार होत होत नाही की डोके दुखत नाही. नाशिककरांनी नियमित हेल्मेट वापरले पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थी स्टाईलसाठी साईड मिरर नसलेल्या दुचाकी हेल्मेट घालून चालवतात.. दुचाकी भरधाव वेगाने चालवताना उजव्या किंवा डाव्या बाजूस पटकन पाहतात, त्यावेळी त्यांची मान किंवा पाठ लचकण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी वाहनांना साईड मिरर बसवावेत. – डॉ. शैलेंद्र पाटील, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -