घरमहाराष्ट्रनाशिकबोंडारमाळला अवतरली जलगंगा!

बोंडारमाळला अवतरली जलगंगा!

Subscribe

दमणगंगा नदीच्या पात्रापासून दीड किलोमीटर उंचावर वसलेल्या पेठ तालुक्यातील बोंडारमाळ या अतिदुर्गम गावाला ७० वर्षानंतर जलगंगा अवतरली आहे.

दमणगंगा नदीच्या पात्रापासून दीड किलोमीटर उंचावर वसलेल्या पेठ तालुक्यातील बोंडारमाळ या अतिदुर्गम गावाला ७० वर्षानंतर जलगंगा अवतरली आहे. बोंडारमाळच्या ग्रामस्थांनी श्रमदान करत दमणगंगा नदीच्या पात्रात विहीर खोदून दीड किलोमीटर पाईपलाईनच्या सहाय्याने गावात पाणी आणले आहे. अखिल भारतीय पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांचे हस्ते जय जनार्दन जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले.

आपुलकी सेवाभावी ग्रुपच्या सहकार्याने व उद्योजक दौलत कुशारे यांच्या सामाजिक दातृत्वातून बोंडारमाळ हे गाव कायमस्वरुपी जलयुक्त झाले आहे. भीषण पाणीटंचाईच्या काळात जवळपास दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणणार्‍या महिलांचे हेलपाटे बंद झाले आहेत. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, दौलत कुशारे, नंदा कुशारे, निलांबरी पाटील, नुपूर पाटील, नीलेश कुशारे, गौरी कुशारे, तेजस्विनी कुशारे, आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रुपचे अध्यक्ष खंडेराव डावरे, राकेश दळवी, विष्णू हगवणे, चंद्रशेखर पठाडे, शांताराम गायकवाड,.सतीश चितोडकर, जयवंत राऊत, संदीप बत्तासे, कविता डावरे, अरुण सुबर, सरपंच मीना पवार, दिनेश पवार, मुझफर शेख, रामदास शिंदे, अरुण बेलदार, कमोद गाडर, कैलास गाडर, हिरामण वातास, हिरामण गाडर, गुलाब पेटार, रामचंद्र वातास, सोमा वातास, काळू वातास यांच्यासह उम्रद व बोंडारमाळ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचलन केले, तर अरुण बेलदार यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -