घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रधक्कादायक : नाशकात ओमायक्रॉनचा शिरकाव?

धक्कादायक : नाशकात ओमायक्रॉनचा शिरकाव?

Subscribe

पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरियंटने नाशिकमध्ये शिरकाव केला आहे. पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली असून, आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

पश्चिम आफ्रिकेच्या माली या देशातून तीन नागरिक नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत आले आहेत. तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आल्याने संबंधित नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा आरोग्य विभागातर्फे शोध घेतला जात आहे. तसेच, जिनोम स्क्वेन्सिंगचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -