घरमहाराष्ट्रनाशिकधुळ्यात नरेंद्र मोदींच्या करिष्मा

धुळ्यात नरेंद्र मोदींच्या करिष्मा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डॉ. भामरे हे विश्वासू खासदार असून भाजपचे हायप्रोफाईल नेते असल्याने त्याचा फायदा निवडणुकीत झाला.

लोकसभा धुळे मतदारसंघात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत झाली. धुळे मतदारसंघात युतीकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आघाडीकडून आमदार कुणाल पाटील निवडणूक रिंगणात होते. विजयासाठी युती व आघाडीने रणनिती आखली. त्यात युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे विजयी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डॉ. भामरे हे विश्वासू खासदार असून भाजपचे हायप्रोफाईल नेते असल्याने त्याचा फायदा निवडणुकीत झाला. डॉ. भामरेंना हरवण्यासाठी भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवली. मात्र, त्याचेच डिपॉझिट जप्त झाले. धुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक विजयी झाल्याने डॉ. भामरेंना हरवण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले. त्याचा फारसा परिणाम धुळ्यात नरेंद्र मोदींचा करिष्मा असल्याने दिसून आला नाही.

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील तीन, तर नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. २००४, २००९, २०१४ व २०१९ मध्ये सलग भाजपला कौल मिळाला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजप उमेदवार प्रतापदादा सोनवणे निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रतिस्पर्धी काँग्रेसचा पाडाव करत मतदारसंघात वर्चस्व राखले आणि बघता बघता केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रिपद मिळवले. त्यामुळे आपल्या हाताखालचा उमेदवार निवडणुकीत वरचढ ठरतो आणि मंत्रिपद मिळवतो, याचे शल्य पाटील यांसह स्थानिक पुढार्‍यांना बोचत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा धुळे मतदारसंघात चालल्याने त्याचा फारसा फरक पडला नाही. मराठा- पाटील, मुस्लिमबहुल असलेल्या धुळे मतदारसंघात मतविभाजनाच्या डावपेचांवर भर दिला जाण्याची शक्यता होती. मात्र, धुळेकरांनी डॉ. भामरे यांना मतदान करत महायुतीच्या बाजूने कौल दिला.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा धुळे येथे घेतल्यामुळे कुणाल पाटील यांचे भाषण सर्वांच्या औस्त्युक्याचा विषय ठरला. मुस्लिमबहूल भागात मतविभाजन करून काँग्रेस आघाडीची शक्ती क्षीण करण्याचा भाजपच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निवडणुकीत भाजप- शिवसेनेत युती, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली. भाजपचा पाडाव करण्यासाठी काँग्रेस आघाडीत एकी दिसली तर भाजप-शिवसेनेत युती झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी उभयतांमध्ये मनोमिलन झाले नाही. मात्र, पंतप्रधान मोदींच्या करिष्मामुळे त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यावरच युतीचे उमेदवार डॉ. भामरे यांचा विजय मानला जात आहे. आमदार अनिल गोटे यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. यामुळे आमदार गोटेंना मानणारे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांमध्ये विभागणी करतील असले अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. भामरेंना घवघवीत मते दिल्याचे दिसून आले. डॉ. भामरेंविरोधात आमदार गोटेंनी प्रचार सुरू केल्याने त्याचा मतदानावर परिणाम होईल असे अनेकांना वाटले पण अप्रत्यक्षात त्याचा परिणाम झाला नाही.

डॉ. भामरे यांचा परिचय

खासदार सुभाष रामराव भामरे यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५३ रोजी झाला असून १६ व्या लोकसभेचे धुळे मतदार संघाचे भाजपचे खासदार आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण मुंबईत ग्रॅन्ट मेडीकल कॉलेज, जे जे रूग्णालय आणि टाटा कॅन्सर रूग्णालय येथे झाले असून ते कॅन्सरतज्ज्ञ आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव बिना भामरे नाव असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या आई गोजरताई भामरे या विधानसभा सदस्य होत्या. ते केंद्र सरकारचे ५ जुलै २०१६ पासून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आहेत. बास्केटबॉल व खो-खो हे त्यांचे आवडते खेळ आहेत. त्यांनी धुळे मतदार संघात अनेक आरोग्य शिबीरे राबवत रूग्णसेवा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -