घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निर्देश

उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निर्देश

Subscribe

लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून होणारा वारेमाप खर्च बघता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला खास निवडणुकीसाठी कुठल्याही बँकेत खाते उघडावे लागणार आहे.

निवडणुकीत मोठया प्रमाणात विविध राजकीय पक्ष वेगवेगळया कारणावर खर्च होत असला तरी अनेकदा त्याची कुठेही नोंद होत नाही. यांसदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांना निवडणुक खर्चासाठी कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, टपाल खाते आदी ठिकाणी स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. नामांकन अर्ज भरतांना बँक खात्याची माहिती देणे बंधनकारक आहे. या खात्यातून उमेदवारांना प्रचारासाठी खर्च करावा लागणार असून देणी धनादेशाव्दारे करावे लागणार आहे.

- Advertisement -

दर आठ दिवसांनी निवडणूक अधिकार्‍यांच्या आदेशानुसार संबधित उमेदवारांचा खर्चाचा तपशील बँककडून घेण्यात येईल आणि नोंद त्यांच्याकडे राहील. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रूपयांची खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. प्रचाराकरीता लागणार्‍या खर्चासाठी दरही ठरवून देण्यात आले आहे. याच दरानुसार उमेदवाराला खर्च सादर करावा लागणार आहे. या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने पथकही नियुक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -