घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेतील अनुकंपा भरतीचा प्रश्न अखेर निकाल

महापालिकेतील अनुकंपा भरतीचा प्रश्न अखेर निकाल

Subscribe

सेनेच्या पाठपुराव्यानंतर १४० नियुक्त्यांचे आदेश निर्गमित

नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतील गट क व ड संवर्गातील दिवंगत झालेल्या कर्मचार्‍यांना मनपाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी 2013 पासून प्रदिर्घ लढा चालवला होता. मात्र मागच्या प्रशासनाच्या काळात झालेल्या चुकीच्या नियुक्त्यांमुळे सन 2013 पासूनच्या पुढच्या नियुक्त्यांना शासन मान्यता मिळण्यात मोठया प्रमाणात अडथळा निर्माण झालेला होता. यामुळे हे वारस अक्षरक्ष: मागील काही वर्षापासून हवालदिल झालेले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा विषय मार्गी लावल्याने अनुकंपा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक शिवसेना नेत्यांनी पुढाकार घेवून मुख्यमंत्र्याकडे हा प्रश्न मांडत याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नगरविकास मंत्रालयाला आदेश देवून राज्य शासनामार्फत महापालिकेला मंजुरी देण्याचे आदेश दिले. अवघ्या एक महिन्यात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कार्यवाही करुन मागील काळातील 132 अतिरीक्त नियुक्त्या करण्याची बाब क्षमापीत करुन या वारसांना मनपा सेवेत घेण्याबाबत 19 जानेवारी रोजी मंजूरी दिली. कोविड संकटामुळे ही प्रक्रिया धीम्यागतीने सुरू होती. कोविडचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला या नियुक्त्यांबाबत शीघ्रतेने कार्यवाही करण्यास भाग पाडले. अखेर शुक्रवार २५ जून रोजी प्रशासनामार्फत दिवगंत कर्मचार्‍यांच्या वारसांचे एकूण 140 नियुक्त्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले. तर उर्वरीत 7 वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता झालेनंतर त्यांना नियुक्ती आदेश दिले जाणार आहे. तसेच सद्यस्थितीत एकूण 175 वारस अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र असल्याचे प्रशासनामार्फत कळविण्यात आलेले आहे. शिवसेनेच्या सरकारमुळे आम्हांला न्याय मिळाला असल्याची भावना यावेळी या वारसांनी व त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. महापालिका कर्मचार्‍यांच्या सतत पाठीशी राहील अशी ग्वाही बोरस्ते व शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -