घरक्राइमकापडणीस पिता-पुत्र खूनप्रकरण कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीमुळे खून

कापडणीस पिता-पुत्र खूनप्रकरण कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीमुळे खून

Subscribe

ती-पत्नीमधील वादात टोकल्याने नानासाहेब कापडणीसांचा खून झाल्याचे निष्पन्न

नाशिक : शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील हायप्रोफाईल कापडणीस पिता-पुत्र दुहेरी हत्याकांडामध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कापडणीस पिता-पुत्राची हत्या एकही क्रिमीनल रेकॉर्ड नसलेला, तरुणांचा आयडॉल, शेअर मार्केटमध्ये तरबेज आणि हॉटेल व्यावसायिक असलेल्या राहुल जगताप याने केल्याचे समोर आले आहे. या खूनप्रकरणात पती-पत्नीमधील वादात टोकल्याने नानासाहेब कापडणीसांचा खून झाल्याचे पुढे आले आहे.

राहुलच्या मारहाणीमुळे नानासाहेब बेशुद्ध झाले. त्यांना राहुलने निर्जनस्थळी नेले. पाणी शिंपडत शुद्धीवर आलेल्या नानासाहेबांची त्याने माफी मागितली. मात्र, नानासाहेबांनी पुन्हा टोकल्याने राहुलने त्यांचा खून केला. तर, नानासाहेबांच्या मोबाईलमधून सव्वाकोटी, बँक खाते, प्रॉपर्टीची माहिती मिळाल्याने डॉ. अमितचा खून केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

कापडणीस पिता-पुत्राचा खून करणारा राहुल कधीही एक व्यवसाय करत नव्हता. त्याचे पत्नीसमवेत सारखे वाद व्हायचे. तो कापडणीस राहत असलेल्या सोसायटीतच राहत असल्याने दोघांच्या वादात नानासाहेब मध्यस्थी करायचे. एका अशाच प्रसंगात राहुलने जुना गंगापूर नाका येथे नानासाहेबांशी चर्चा केली. त्यावेळी नानासाहेबांनी त्याला टोकले. रागातून त्याने त्यांना फटका मारला. त्यात ते बेशुद्ध झाले होते. शेवटी घाबरून त्याने नानासाहेबांना निर्जनस्थळी नेले व त्याच ठिकाणी त्यांचा खून केला. कापडणीस यांच्या घरी कुणीही येत नसल्याने डॉ. अमितचा खून केल्याचेही सांगितले.

‘या’ कारणांसाठी मुख्य सूत्रधाराने नानासाहेब जिवंत असल्याचे भासवले

राहुल जगतापने कापडणीस पिता-पुत्रांचा खून केल्यानंतर नानासाहेबांचा मोबाईल वापरणे सुरू केले. त्यांच्या येणार्‍या कॉलवर त्याने नानासाहेब बोलत असल्याचे भासवले. कोरे चेक हस्तगत करत त्याने ४० लाख डॉ. अमितच्या खात्यावर जमा करुन पोलिसांची दिशाभूल केली. नानासाहेबांचा खून करुन अमित गोव्याला गेल्याचे भासवले. सावरकरनगरमधील बांधकामाशी संबंधित व्यक्तींचे पैसे देणे सुरू केले होते. सर्व देणी दिल्यानंतर दोन वर्षांनी ती प्रॉपर्टी डमी नानासाहेब उभे करुन हडप करण्याचे राहुल जगतापने नियोजन केले होते. मात्र, पोलीस तपासात तो अडकला.

आरोपीने तीनवेळा सांगितली खूनाची वेगवेगळी कारणे

  • पोलिसांनी राहुल जगतापला तीन-चारवेळा सरकारवाडा पोलीस ठाण्यात चौकशीत बोलावले होते. पुरावे आणि चौकशीत तो मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. दृश्यम चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीने त्याने खून केल्याचे सांगितले.
  • त्याने पहिल्यांदा सांगितले, नानासाहेब आणि डॉ. अमित जीवंत आहेत. नाशिकमधील लोकांची देणी देता येत
    नसल्याने ते निघून गेले आहेत, असे सांगितले.
  • दुसर्‍यांदा त्याने डॉ. अमितनेच नानासाहेबांचा खून केला आहे. फसायचे नव्हते म्हणून मदत घेतली. शेअरची माहिती असल्याने अमितने पैसे दिले. अमित पळून गेला आहे. त्याला पकडल्यास नानासाहेबांचा मृतदेह सापडेल, असे सांगितले.
  • तिसर्‍यांदा त्याने नानासाहेबांचा खून केल्याची कबुली दिली. आर्थिक व्यवहाराने नानासाहेब व अमितच्या खात्यांवर
    झाल्याचे सांगितले. शेवटी त्याने प्रॉपर्टीसाठी त्याने अमितचा खून केल्याचे सांगितले.
  • पोलिसांनी घटनास्थळी जात कापडणीस पिता-पुत्राच्या मृतदेहांची स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या फोटोव्दारे
    शहानिशा केली.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -