घरमहाराष्ट्रनाशिकवैतरणा जलविद्यूत प्रकल्पावर दरड कोसळली

वैतरणा जलविद्यूत प्रकल्पावर दरड कोसळली

Subscribe

वीजनिर्मिती बंद; दोन पोलीस चौक्या उद्ध्वस्त

मुंबईला वीजपुरवठा करणार्‍या इगतपुरी तालुक्यातील वैतरणा जलविद्यूत प्रकल्पाचा मुख्य दरवाजालगत दरड कोसळून डोंगरावरील पाण्याचा तीव्र प्रवाह आत शिरल्याने प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उद्ध्वस्त झाल्या. या घटनेत प्रकल्पात उभी वाहने वाहून गेल्याचे समजते. काही वाहने ढिगार्‍यात दाबली असल्याचेही स्थानिकाकडून कळते. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची हत्यारेही वाहून गेल्याचे वृत्त आहे. अचानक ढगफुटीप्रमाणे झालेल्या अतिवृष्टीमुळे ही घटना घडली
येथील पोलीस आणि सुरक्षारक्षकांसह अन्य व्यक्ती तत्काळ बाहेर पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

वीजनिर्मिती केंद्राकडे जाणार्‍या रस्त्यावरही दरड कोसळली असल्याने रस्ता बंद झाला आहे. विजनिर्मितीचे काम थांबवले असून पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे आदी प्रशासकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -