घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविहिरीत पडलेल्या बिबट्याची दोन दिवसांनी सुटका

विहिरीत पडलेल्या बिबट्याची दोन दिवसांनी सुटका

Subscribe

वनविभागाचे रेस्क्यू

सिन्नर तालुक्यातील कोनांबे शिवारामधील विहिरीत पडलेल्या तीन वर्षांच्या बिबट मादीला दोन दिवसांनी सुखरुप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. पहिल्या दिवशी विहिरीत शिडी टाकून मादीला बाहेर काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुसर्‍या दिवशी सोमवारी (दि.१६) वनविभागाने क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा सोडून बाहेर काढले.

शनिवारी (दि.१४) रात्री मादी कोनांबे शिवारातील काशीनाथ शंकर डावरे यांच्या विहिरीत पडली. विहीर 80 फूट खोल व पाच फूटापर्यंत पाणी होते. मादीने पाण्यात पोहून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. शेवटी मादीने विहिरीतील कपारीचा आधार घेतला. रविवारी (दि.१५) सकाळी ११ वाजेदरम्यान डावरे यांना शेतकाम करत असताना विहिरीतून डरकाळ्यांचा आवाज आला. डावरे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्याला दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधत माहिती दिली. त्यानुसार सिन्नर व नाशिकच्या रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला खबरदारीचा उपाय म्हणून परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी दोरीच्या सहाय्याने लाकडी बाज विहिरीत सोडण्यात आली. कपारीवर बसलेली बिबट मादीला लाकडी बाजवर बसली. मात्र, बाज दोरीने वर ओढताना बिबट मादी पुन्हा पाण्यात उडी घेतली. त्यामुळे रविवारी दिवसभर मादी विहिरीतच होती.

- Advertisement -

शेवटी वनविभागाने विहिरीत क्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. क्रेनला पिंजरा बांधून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. कपारीजवळ पिंजरा जाताच मादीने पिंजर्‍यात उडी घेतली. त्यानंतर पिंजरा विहिरीबाहेर आणण्यात आला. मादीला मोहदरी वनउद्यानात आणण्यात आले. ही कामगिरी उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नरचे मनिषा जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी प्रितेश सरोदे, अनिल साळवे, राऊसाहेब सदगीर, वनरक्षक रोहित शिंदे, आकाश रुपवते, कैलास सदगीर, किरण गोरडे, सोमनाथ गाढवे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -