घरमहाराष्ट्रनाशिकथरार! बिबट्याच्या तोंडातून लहानगीची सुटका

थरार! बिबट्याच्या तोंडातून लहानगीची सुटका

Subscribe

टाकेदसह अकोले तालुक्यातही घटना; नागरिकांमध्ये दहशत

बिबट्याच्या जबड्यातून दीडवर्षीय बालिका केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एक दिवसापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात दहावर्षीय बालक ठार झाल्याची घटना काळुस्ते शिवारात घडली होती. आता पुन्हा याच परिसरात सहा वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेतही बालक बालंबाल बचावला. दोन्ही गंभीर बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुगाव खुर्द गावात बिबट्याचा थरार

पहिल्या घटनेत, अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुखदेव भिकाजी वैद्य यांचे रस्त्यावरच घर आहे. त्यांची नात माई जनक वैद्य (वय दीड वर्ष) सायंकाळ ७ च्या सुमारास घराच्या ओट्यावर खेळत होती. बाजूच्या ऊसातून अचानक आलेल्या बिबट्याने बालिकेवर झडप घालत जबड्यात पकडले व तिला घेऊन जाऊ लागला. हे पाहून तेथे असलेल्या तिच्या बहिणींनी आरडाओरड सुरू केली. माईचे आजोबा व घरातील लोक बिबट्यामागे पळाले. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने मुलीला सोडून बाजूच्या ऊसात पळ काढला. घरापासून सुमारे १०० फूट बिबट्या या मुलीला घेऊन गेला होता. असे या बालिकेचे नाव आहे.

- Advertisement -

या घटनेने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या व जखमी झालेल्या या बलिकेच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तिला तातडीने अकोले येथील डॉ. भांडकोळी यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला अन्य रुग्णालयात दाखल करणयात आले. तिच्या गळ्याभोवती बिबट्याच्या दातांमुळे गंभीर जखमा झालेल्या आहेत. परिणामी, एकूण २५ टाके पडले आहेत. वनविभागाच्या वतीने वैद्यकीय खर्च केला जाणार आहे.

हल्ल्यात सहावर्षीय बालक जखमी

दुसरी घटना सोमवारी सायंकाळी घडली. इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील सहावर्षीय बालकावर बिबट्याने झडप घातली. यात बालक जखमी झाला. शेळी चारण्यासाठी गेलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्यावर तो ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता ही घटना घडल्याने दहशत पसरली आहे. या बालकास तत्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -