घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'रेन फॉरेस्ट रिसॉर्ट'मध्ये व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण

‘रेन फॉरेस्ट रिसॉर्ट’मध्ये व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण

Subscribe

इगतपुरी : तालुक्यातील बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट हॉटेलमध्ये शनिवार व रविवारी मुंबईचे पर्यटक कुटुंबासह आले असता एका रूममध्ये महिलेच्या अंगावर टाईल्स पडल्या. त्यात महिला जखमी झाली. या घटनेची तक्रार करण्यासाठी संबधित पर्यटक हॉटेल व्यवस्थापनेकडे गेले असता हॉटेलची बदनामी होईल, या कारणाने व्यवस्थापकाने व कर्मचार्‍यांनी महिला पर्यटकांना शिवीगाळ करत मारहाण केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवार व रविवार सुटीनिमित्त े इगतपुरी शहर आणि तालुक्यात हॉटेल व्यवसाय तेजीत असतो. शनिवारी (दि. १०) मुंबई येथील पर्यटक प्रमोद लोखंडे, अनिल गायकवाड व शार्दुल परदेशी हे परिवारासह ऑनलाइन बुकींग करून रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे आले होते. शनिवारी या कुटुंबियातील एका महिलेच्या अंगावर टाइल्स पडल्याने ती जखमी झाली. शनिवारी प्राथमिक उपचार केल्यानंतर या पर्यटकांनी रविवारी हॉटेलचे व्यवस्थापक मनीष जैन यासोबत या घटनेची तक्रार व चर्चा करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापक मनिष जैनला संपर्क केला. मात्र, जैन याने या पर्यटकांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली.

- Advertisement -

याप्रकरणी पर्यटकांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस ठाण्यात हॉटेल व्यवस्थापक मनिष जैन व कर्मचारी यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यवसायिकांच्या मर्जीतील गुंडप्रवृत्तीचे काही युवक पर्यटकांना मारहान, शिवीगाळ करीत नाहक त्रास देत मोठया रकमेची मागणी करतात. त्यामुळे पर्यटकाची सुरक्षा धोक्यात आल्याचे पर्यटक प्रमोद लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -