घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'नाशिक स्पेशल शूटिंग झोन' व्हावे; फिल्म इंडस्ट्रीला मिळेल चालना

‘नाशिक स्पेशल शूटिंग झोन’ व्हावे; फिल्म इंडस्ट्रीला मिळेल चालना

Subscribe

नाशिक : मालिका व चित्रपट चित्रीकरणासाठी नाशिक, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणे आहेत. नाशिकला स्पेशन शुटींग झोनचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यामुळे नाशिकचे अर्थकारण वाढेल. मालिका व चित्रपट शुटींगसाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. एक खिडकी योजना सुरु झाल्यास एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळतील, अशी माहिती सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर याने पत्रकार परिषदेत दिली.

चिन्मय उदगीरकर म्हणाले की, नाशिकला चित्रपटनगरी सुरु होण्यासाठी प्रयत्नशील आहे. नाशिकमध्ये वेबसिरीजचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, प्रशासनाकडून चित्रपट, मालिकांना सहकार्य मिळत आहे. नाशिकमध्ये दादासाहेब फाळके स्मारक, स्टुडीओ असले तरी चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण सातत्यपूर्ण सुरु झाले पाहिजे. कोरोनाकाळात आऊटडोअर शुटींग सुरु झाल्याने मुंबईनंतर नाशिकला चित्रपटसृष्टीचे दुसरे हब म्हणून पाहिले जात आहे. मुंबईहून नाशिकला रेल्वे, राष्ट्रीय महामार्गामुळे लवकर ये-जा करता येते. नाशिकमधील कलावंत उत्तम दर्जाचे आहेत. नाशिक, इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये चित्रीकरणासाठे निसर्गरम्य ठिकाणी बॉलीवूडमधील दिग्दर्शकांना भुरळ पडली आहे.

- Advertisement -

संजय झनकर म्हणाले की, नाशिकला चित्रपटसृष्टी झाली पाहिजे. त्यासाठी सुविधा व साधने उपलब्ध झाली पाहिजेत. शुटींग, परवानगी, कलाकार व इतर कामगारांची निवास व इतर व्यवस्था करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यावेळी बाळकृष्ण तिडके, संजय झनकर, निलेश जगताप, राजेश पंडीत, धीरज बच्छाव, आदिनाथ ढाकणे, योगेश बर्वे आदी उपस्थित होते.

काय म्हणाला चिन्मय उदगीरकर..

  • नाशिकला सातत्यपूर्ण चित्रपट व मालिकांचे शुटींग सुरु राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत प्रयत्न सुरु आहेत.
  • चित्रीकरणासाठी जमिनी योग्य भावात मिळाव्यात.
  • मालिकेचे चित्रीकरण करताना नाशिकमध्ये अडचणींना सामोरे जावे लागले.
  • चित्रीकरणासाठी २४ तासांची परवानगी मिळाली पाहिजे.
  • चित्रीकरणाच्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावे.
  • चित्रीकरणानिमित कलाकार व तांत्रिक काम करणारे कामगार नाशिकला येत असतात. त्यांना ३० टक्के सवलतीच्या दरात हॉटेल्स उपलब्ध झाली पाहिजेत.

शंकर महाराजांचा कृपाशीर्वाद, चित्रीकरणात एकदाही खंड नाही

नाशिकमध्ये “योगयोगेश्वर जय शंकर” या मालिकेचे चित्रीकरण करताना १०० दिवसांमध्ये एकही कलाकार आजारी पडला नाही. सदगुरु श्री शंकर महाराज यांचे ९५ वर्षीय शिष्य पेंटर काका उर्फ रघुनाथ कडलास्कर यांनी काही दिवसांपूर्वी सेटवर येत बालशंकरला भेटले. त्यांना सेटवर गहिवरुन आले होते. हा अनोखा अनुभव होता. श्री शंकर महाराजांची सेटवर नेहमीच प्रचिती येत असते. शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे चित्रीकरणात एकदाही खंड आला नाही, हा शंकर महाराजांचा चमत्कार आहे, असे चिन्मय उदगीरकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -