घरमहाराष्ट्रनाशिकआंब्याची अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया वारी

आंब्याची अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया वारी

Subscribe

लासलगाव येथून अडीच टन रवाना; १०० टन निर्यातीची शक्यता

नीलेश बोरा, लासलगाव

लासलगावमार्गे १० एप्रिलपासून आंब्याची निर्यात सुरू झालेली आहे. आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्‍या आंब्याची अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलियाला सुद्धा वारी सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियासाठी देशातून पहिली अडीच टन आंब्यांची मालवाहतूक लासलगाव येथून प्रक्रिया होऊन रवाना करण्यात आलेला आहे. भारतीय आंबे चविष्ट असल्याने ऑस्ट्रेलियामध्ये मागणी असल्याने जून अखेरपर्यंत १०० टन आंबा तेथे निर्यात होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून आंब्यावर प्रक्रिया करून अमेरिकामध्ये गेल्या काही वर्षपासून आंबा निर्यात करण्यात येत आहे. आता ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये आंबा निर्यात झालेला आहे. दरवर्षी साधारणत एप्रिल ते जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात विकिरण प्रक्रिया केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ‘कृषक’च्या माध्यमातून ही सर्व विकिरण प्रक्रिया पार पाडली जात होती. भाभा अणुसंशोधन केंद्राशी केलेला करार संपुष्टात आल्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या अँग्रो सर्च कंपनीने भाडेतत्त्वावर घेतला आहे. अमेरिकेला,ऑस्ट्रेलियात जाणार्‍या आंब्यांमध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.

निर्यात आलेख

वर्ष –  निर्यात (मॅट्रिक टन)

२००८ – २७५
२००९ – १२१
२०१० – ९६
२०११ – ८५
२०१२ – २१०
२०१३ – २८१
२०१४ – २७५
२०१५ – ३२८
२०१६ – ५६०
२०१७ – ५४५
२०१८ – ५९१

- Advertisement -

३०० टन आंब्यावर प्रक्रिया

यंदाच्या हंगामातील आतापर्यंत ३०० मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून हा आंबा व्यापार्‍यांकडून अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथे आंबे पाठवण्यात आले आहेत. या वर्षी १००० मेट्रिक टन आंबाचे उदिष्ट असल्याचे प्रणव पारिख, संजय आहेर आणि महेंद्र अवधाने यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -