घरमहाराष्ट्रनाशिकमंत्री डॉ. भारती पवारांच्या कार्यकर्त्यांना वेट अँड वॉच

मंत्री डॉ. भारती पवारांच्या कार्यकर्त्यांना वेट अँड वॉच

Subscribe

पवार नाशिकला कधी येणार याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता

नाशिकच्या पहिल्या महिला खासदार केंद्रिय मंत्री झाल्यानंतर डॉ.भारती पवार या नाशिकला कधी येणार याविषयी नागरिकांना उत्सुकता लागून आहे. परंतु, त्यांच्या स्वागतासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. मंत्री डॉ.भारती पवार या येत्या १५ जुलैपर्यंत दिल्लीतच राहणार असल्यामुळे कार्यकर्त्यांना ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ करावे लागेल.

दिंडोरी लोकसभेच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना मंत्रिपदाची अचानक लॉटरी लागली. अत्यंत मितभाषी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ.पवार यांच्या चाहत्यांना अत्यंत आनंद झाला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या नजरा थेट दिल्लीकडे लागल्या आहेत. मंत्री डॉ.भारती पवार या नाशिकमध्ये केव्हा येतात,याची मतदारसंघातील कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून आहे. परंतु, अजून काही दिवस त्यांना वाटच बघावी लागणार असल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने नव्याने ४३ मंत्र्यांना संधी देत मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात महाराष्ट्रातून नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्री तर भिवंडीचे कपिल पाटील, औरंगाबादचे डॉ.भागवत कराड आणि नाशिकच्या डॉ.भारती पवार यांची राज्यमंत्री म्हणून निवड केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे वजन वाढल्याने भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -