घरताज्या घडामोडीमोबाईल विक्रेत्याची रेल्वेखाली आत्महत्या

मोबाईल विक्रेत्याची रेल्वेखाली आत्महत्या

Subscribe

निफाड तालुक्यातील नादुंर्डी येथील मोबाईल विक्रेत्याने गुरुवारी (दि.२०) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कुंदेवाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली. रामदास मोहन कापसे (वय ४१) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रामदास कापसे यांनी गुरुवारी सकाळी कुंदेवाडी शिवारात जनता एक्सप्रेसखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दुचाकी अपघात चालक जखमी
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने दुचाकी चालवत रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना व्हाईट हाऊससमोर, कॅनडा कॉर्नर येथे घडली. याप्रकरणी यतिन पाटील यांनी सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी शुभम नामदेव जाधव (२१, रा.सिन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम जाधव याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने दुचाकी (एमएच १५-एफ.एफ.५३०७) चालवित रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याचा मित्र वैभव क्षत्रिय किरकोळ जखमी झाला. पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.

- Advertisement -

प्रवाशाचा मोबाईल लंपास
बसमध्ये बसलेल्या प्रवाशाची नजर चुकवून चोरट्याने मोबाईल लंपास केल्याची घटना व्दारका सर्कल येथे घडली. याप्रकरणी रमेश दवजी पटेल यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश पटेल बाहेरगावी जाण्यासाठी व्दारका सर्कलजवळ आले. ते पारीख ट्रव्हल्सच्या बसमध्ये बसले असताना त्यांची नजर चुकवून चोरट्याने मोबाईल लंपास केला. पुढील तपास पोलीस नाईक नांदुर्डीकर करत आहेत.

समर्थनगरमधून दुचाकी लंपास
दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना शिवशक्ती अपार्टमेंट, समर्थनगर येथे घडली. याप्रकरणी मनीष तायडे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मनीष तायडे यांनी दुचाकी (एमएच १९-सीएम-७८२२) शिवशक्ती अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंगमध्ये आले असता त्यांना दुचाकी लंपास झाल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस नाईक फसाळे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -