घरताज्या घडामोडीलाकडी दांडक्याने गुराख्याचा खून; हल्लेखोर फरार

लाकडी दांडक्याने गुराख्याचा खून; हल्लेखोर फरार

Subscribe

कुख्यात गुन्हेगार बाबा शेख यांचा खून केल्याची घटना ताजी असताना सोमवारी रात्री दोन हल्लेखोरांनी दहीपुल परिसरात गुराख्याचा लाकडी दांडक्याने वर्मी घाव करत खून केल्याचे उघडकीस आले आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुराखी हिरालाल प्रजापती (40, सध्या रा. माडसांगवी टोलनाका, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजेदरम्यान भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सचिन अहिर व होमगार्ड भरत रामअवतार मल्ला हे रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना तिवंधा चौक येथे दुचाकीवरून एकजण आला. त्याने सांगितले की, दोनजण लाकडी दडक्याने एकाला मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार ते घटनास्थळी गेले असता त्यांना एकजण बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्या ठिकाणी एका महिलेने हल्लेखोर सराफ बाजाराकडे गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी पाहणी केली असता कोणी आढळून आले नाही. पोलिसांनी रुग्णवाहिकेस संपर्क साधला. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असे मृत घोषित करण्यात आले. त्याच्या कपड्याची पाहणी केली असता खिशात मोबाईल सापडला. त्याव्दारे पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी त्याच्या मोबाईल दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता मृताचे नाव हिरालाल प्रजापती असल्याचे समजले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -