घरताज्या घडामोडीकुरापत काढत नाशिकरोडला एकाचा खून

कुरापत काढत नाशिकरोडला एकाचा खून

Subscribe

किरकोळ वादातून टोळक्याने एकाच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२७) रात्री १० वाजेदरम्यान रेल्वे ट्रॅक्शन, एकलहरा रोड येथे घडली. याप्रकरणी राहुल जमधडे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. प्रकाश शंकर ढाले (३६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री प्रकाश शंकर ढाले (३६) हे रेल्वे ट्रॅक्शन गेटसमोरील एकलहरा रोडने घराच्या दिशेने जात होते. त्यावेळी बाळासाहेब शिंगार व त्यांची मुले सागर, दिनेश आणि पत्नी अनिता शिंगार यांनी प्रकाश ढाले याच्याशी कुरापत काढली. ढाले यास बेसबॉलच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. ढाले यांच्या डोक्यात दांडक्याने वार केल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करत ढाले यांना मृत घोषित केले. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -