घरताज्या घडामोडीमविप्र संस्थेच्या 11 वीचा निकाल ऑनलाईन

मविप्र संस्थेच्या 11 वीचा निकाल ऑनलाईन

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता 11वीच्या सर्व शाखांचे निकाल सोमवारी (दि.11) रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन प्रसिध्द केला जाणार आहेत. संस्थेच्या https://mvperp.org या संकेतस्थळावर निकाल बघायला मिळेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर तालुका निवडून कॉलेजचे नाव सिलेक्ट करावे. त्यानंतर विद्याशाखा (कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी) निवडावी व त्यानंतर आपल्या प्रवेशपावती वरील युआरएन क्रमांक टाकावा. तसेच युआरएन क्रमांक नसल्यास आपले नाव टाकून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. संस्था स्तरावर विद्यार्थ्यांना निकाल देणारी मविप्र ही पहिलीच संस्था ठरली आहे. विद्यार्थ्यांना निकाल बघण्याचे आवाहन संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार व शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर काजळे यांनी केले आहे.

9 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -