घरमहाराष्ट्रनाशिकभुयारी मार्ग पाण्यात ; नांदगावकरांचा जीव धोक्यात

भुयारी मार्ग पाण्यात ; नांदगावकरांचा जीव धोक्यात

Subscribe

‘डबक्यातील उड्या... खेळ नवा...’; सोशल मीडियावर कार्टून्सची चर्चा

नांदगाव शहरातील रेल्वे मार्गावर सतत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत रेल्वेने फाटक बंद करून पर्यायी मार्ग म्हणून नव्याने भुयारी मार्ग सुरू केला. सदर भुयारी मार्ग हा पावसाळा सुरू होण्याअगोदरच पाणी साचल्याच्या मुद्यावर वादात सापडला त्यातच आता पावसाळ्याच्या ऐन मोसमात भुयारी मार्ग नांदगावकरांसाठी विशेषतः रेल्वे फाटकाकडील पूर्व भागातील नागरिकांना ‘असून अडचण नसून खोळंबा’ होत असल्याने त्याचे कवित्व दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून गायले जावू लागले आहेत. आज सोशल मीडियावर ‘डबक्यातील उड्या… नांदगावकरांचा नवा खेळ…’ असे भुयारी मार्गाला संबोधित करून भुयारी मार्गातील साचलेल्या पाण्यामुळे न थांबणारी रेल्वे गाडी दाखविण्यात आल्याने शहरात सदर विषय हा सर्वत्र चर्चिला जावू लागला आहे.

शहरातील रेल्वे फाटकाजवळ दिवसेंदिवस होत असलेली वाहतुकीची कोंडी या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने शहरातील लेंडी नदी पात्रालगत बांधलेला भुयारी मार्ग बांधून छोट्या वाहनांसाठी व रेल्वे फाटकाकडील १० ते १५ लोकवस्तीच्या नागरिकांसाठी सोईस्कर ठरण्याच्या आतच सदर भुयारी मार्गाला तलावाचे स्वरूप आल्याने शहरातील अनेक समाजिक संघटना, राजकिय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी रेल्वे प्रशासनाबरोबरच जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार यांना निवेदने देवून निवेदनात आंदोलनाचे इशारेही देत वरील सर्वांचेच लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्यावर ठोस असा निर्णय किंवा पर्याय न झाल्याने शहरातील नागरिकांबरोबरच पूर्व भागातील एसटी कॉलनी, विवेकानंदनगर, मल्हारवाडी, आनंदनगर, कैलासनगर, हमालवाडा या नागरी वस्तीतील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करून व जीव धोक्यात टाकून रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

हवामानाच्या अंदाजानुसार शहर व तालुक्यात मुसळधार व अतिवृष्टी होत असल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहे. त्यातच भुयारी मार्गातील पाण्यात इसम वाहून जात असताना त्याला शिताफीने पकडून वाचविण्यात आले. ही घटना ताजी असतानाच आम्ही नांदगावकर म्हणून रेल्वे प्रशासन, नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष पुन्हा वेधण्यासाठी आज बुधवार रोजी येथील हुतात्मा चौकात आम्ही नांदगावकरांतर्फे रास्ता रोकोची हाक दिली गेली आहे. या हाकेला शहरातील सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नांदगावकर, नागरिक साद देवून रस्त्यावर उतरतीलच यात शंका नसली तरी सदर प्रशासनाची यावर काय ठोस कार्यवाही करेल, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -