घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात दोन कारसह अवैध मद्यसाठा जप्त एकाला अटक

नाशकात दोन कारसह अवैध मद्यसाठा जप्त एकाला अटक

Subscribe

एक्साईजची कारवाई

 नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिन्नरच्या पांढुर्ली व नाशिकमधील भगूरमध्ये छापे टाकत महाराष्ट्र विक्रीस बंदी असलेला व दादरा -नगर हवेलीतच विक्रीची मान्यता असलेला हजारो रुपयांच्या मद्यसाठा दोन कारसह जप्त केला. पथकाने एकास अटक केली आहे. दरम्यान, एकजण पळून गेला आहे. अनिल सीताराम साळुंखे (३२ रा. सिंकाराबाद सोसायटी, सिल्वाना बेकरीजवळ, संसरी लेन नं-२ देवळाली कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पहिल्या घटनेत, दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.११) घोटी- सिन्नर रोडजवळील समरा वाईसचे बाजुला पांढुर्लीं शिवार, सिन्नर ठिकाणी तपासणी करीत असताना सॅन्ट्रो कार (एमएच ०४ सी.जे ६८३६) अडविली. तपासात पथकाने मद्याच्या बाटल्या व स्टिकर असा एकूण ३ लाख ३४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे, जवान सुनिल दिघोळे, धनराज पवार, महेंद्र भोये, राहुल पवार व अनिता भांड यांनी केली.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत, दुय्यम निरीक्षक शिवाजी चव्हाणके यांनी भगूर येथील विजय नगर पेट्रोलपंपाजवळ, रेल्वे पुलाचे बाजुला वाहन तपासणी करुन कार (एमएच-१५ सी.एम ९६४६)मधून दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या मद्याच्या १२ सिलबंद बाटल्या जप्त केल्या. कारचा चालक व मालक वाहन सोडून पळून गेला. पथकाने मद्य व वाहन असा एकूण २ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -