घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मधल्या स्टेट बँकेतून एक लाख रुपये लंपास

नाशिक मधल्या स्टेट बँकेतून एक लाख रुपये लंपास

Subscribe

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भामरे करत आहेत.

नाशिक : बँकेतील कर्मचारी असल्याचा बहाणा करत अनोळखी व्यक्तीने एकाचे १ लाख रुपये लंपास केल्याची घटना स्टेट बँक ऑफ इंडिया, दुर्गा गार्डनसमोर, नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी शरद आनंदा उघाडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शरद उघाडे य स्टेट बँकेच्या शाखेत मुलीचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी आले होते. त्यांनी बँक खात्यातून एक लाख रुपये काढून ते दुसर्‍या खात्यावर जमा करत असताना अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने केंद्रात काम करतो, असे सांगत उघाडे यांच्याकडील एक लाख रुपये घेऊन ते तुमच्या मुलीच्या बँकखात्यावर जमा केल्याचे सांगितले. अनोळखी व्यक्तीने उघाडे यांना झेरॉक्स आणण्यासाठी बँकेबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर ते पैसे घेऊन अनोळखी व्यक्ती गायब झाला. उघाडे बँकेत परत आले असता अनोळखी व्यक्ती दिसला नाही. त्यातून फसवणूक झाल्याचे उघाडे यांच्या लक्षात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भामरे करत आहेत.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -