घरमहाराष्ट्रनाशिकअन्यथा दुसर्‍या महाविद्यालयांत प्रवेश द्या

अन्यथा दुसर्‍या महाविद्यालयांत प्रवेश द्या

Subscribe

सपकाळच्या विद्यार्थ्यांनी मांडले प्रशासनाकडे गार्‍हाणे

सपकाळ नॉलेज हब संस्थेच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून एक तर महाविद्यालय सुरू करा अन्यथा आम्हाला दुसरया महाविद्यालयांत प्रवेश द्या अशी मागणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. याबाबत संस्थाचालक यांना पाचारण करून त्यांना समज दिली जाईल,असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळास दिले.

त्र्यंबकरोडवर असलेले सपकाळ नॉलेज हब संस्थेच्या मनमानी आणि अनागोंदी कारभारामुळे हबमधील 4500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. तसेच वर्षभरापासून पगार न झाल्याने हबमधील 250 प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यावर तोडगा काढावा यामागणीसाठी विद्यार्थी व पालकांच्या शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. तसेच यापूर्वी शिष्टमंडळाने पाकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेतली. ना.महाजन यांनी विद्यार्थी-पालक आणि संस्थाचालकांची तातडीने बैठक बोलावून याप्रश्नी त्वरेने तोडगा काढावा असे जिल्हाधिकार्‍यांना आदेशित केल्यानंतर आज प्रशासनाची भेट घेउन निवेदन देण्यात आले. चालू शैक्षणिक वर्ष सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला असून अद्यापपर्यंत वर्ग सुरू न झाल्याने मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते काय अशी चिंता त्यांच्या पालकांना सतावत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास विदयार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय बनेल. प्राध्यापकांचे वर्षभरापासून पगार नसल्याने त्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याप्रश्नीसुद्धा लवकर निर्णय व्हावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी विद्यार्थी आणि पालकांचे म्हणने ऐकून घेऊन संस्थाचालकांना पाचारण करून त्यांना समज दिली जाईल.आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांना अन्य महाविद्यालयांत स्थलांतरित करण्यासाठी पावलेही उचलली जातील, असेही खेडकर पुढे म्हणाले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नात लक्ष घातले असून लवकरच ते याबाबत शिक्षणमंत्री, वित्तमंत्री, समाजकल्याण मंत्री यांची बैठक घेणार आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये हीच कळकळ त्यामागची आहे. मीसुध्दा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना या प्रश्नांत लक्ष घालण्याची विनंती करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -