घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"आधी पार्किंग द्या, मग उपदेश करा"; नाशिक मनपाच्या फेसबुक पोस्टवर नागरिकांचा संताप

“आधी पार्किंग द्या, मग उपदेश करा”; नाशिक मनपाच्या फेसबुक पोस्टवर नागरिकांचा संताप

Subscribe

नाशिक : गाडी नीट पार्किंगमध्येच लावू, रहदारीला अडथळा नका आणू, चला नाशिककर, जबाबदार नागरिक बनू.. अशा आशयाची जागृतीपर पोष्ट महापालिकेने फेसबुकवर टाकली आहे. ही जाहिरात करतांना रविवार कारंजा परिसरातील वाहतुकीच्या वर्दळीचा फोटो वापरण्यात आला आहे. प्रत्यक्षात रविवार कारंजासह शहरातील बहुतांश भागात पार्किंगसाठी पुरेशी जागाच महापालिकेने दिलेली नसल्याने नागरिक वाहने कोठे पार्क करणार असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी फेसबुक पोष्टचा समाचार घेत ‘आधी पार्किंग द्या मग उपदेश करा’ अशी कमेंट प्रशासनाच्या नाकावर टिच्चून टाकली आहे.

शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. नाशिक मुन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीच्या वतीने खासगी-सार्वजनिक भागिदारी (पीपीपीए) तत्त्वावर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रस्त्यांच्या कडेला २८ ठिकाणी, तर मोकळ्या जागांवर पाच अशा ३३ ठिकाणी वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. स्मार्ट सिटी कंपनीने पार्किंग स्लॉट तयार करण्याबरोबरच व्यवस्थापन करण्याचे काम दिल्ली येथील ट्रायजेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सोपवले होते. त्याच काळात कोरोना महामारीचा उद्रेक झाला. यामुळे लॉकडाऊन काळात वाहनतळ सुरू करण्याआधीच बंद पडले. कोरोनाचा प्रादुर्भाव संपून वर्ष उलटले आहे. तरीही महापालिका पार्किंगची व्यवस्था अद्याप करु शकलेली नाही. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावण्याशिवाय गत्यंतर उतर नाही.

- Advertisement -

अशातच महापालिकेच्या फेबसुब पेजवर वाहतुकीच्या कोंडीबाबत जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न झाला आहे. या पोष्टमध्ये म्हटले आहे की, ‘गर्दीच्या ठिकाणी आपण गाड्या नेऊन, रस्त्यावर कुठेही आणि कशाही लावून रहदारीला अडथळा निर्माण करतो. तसे न होऊ देता जबाबदार बनूया. गाड्या पार्किंगमध्येच लावूया, शिस्त पाळूया !’ या पोकळ जागृतीवर नागरिकांनीही नाराजी वर्तवली आहे. दीपक सरोदे यांनी यावर कमेंट केली आहे की, पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. लोकांना खूप जागा उपलब्ध आहे. मैदाने मोफत उपलब्ध करुन द्यावेत, असेही यात म्हटले आहे. तर राहुल पवार यांनी, आधी पार्किंगची सोय करा, मग उपदेश करा, असे सुनावले आहे. नाना बांडे यांनीही पार्किंग कोठे आहे असा प्रश्न महापालिका प्रशासनाला केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -