घरमहाराष्ट्रनाशिकनियोजित सेंट्रल पार्क हे ठिकाण नाशिक शहरातील सर्वात सुंदर व आकर्षणाचा केंद्रबिंदू...

नियोजित सेंट्रल पार्क हे ठिकाण नाशिक शहरातील सर्वात सुंदर व आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार – महाजन

Subscribe

सत्तेच्या पुढील काळात या उद्यानासाठी आणखी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आणि मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराच्या सौन्दर्यात आमूलाग्र भर घातली जाणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण ,जलसंपदा तथा पालक मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

नियोजित सेंट्रल पार्क हे ठिकाण नाशिक शहरातील सर्वात सुंदर व आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार असून सत्तेच्या पुढील काळात या उद्यानासाठी आणखी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण ,जलसंपदा तथा पालक मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटल्यामुळे मागील ३० वर्षांपासून बंद पडलेल्या पेलिकन पार्कच्या १७ एकर जागेवर सिंगापूर च्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्क च्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. सिमा हिरे,महापौर रंजना भानसी ,उपमहापौर प्रथमेश गिते ,सभागृह नेते सतीश सोनवणे,भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे,वसंत गिते,विजय साने,अनिल जाधव ,लक्ष्मण सावजी ,नवीन नाशिक प्रभाग सभापती दिपक दातीर ,प्रभाग २९ नगरसेवक मुकेश शहाणे,छाया देवांग,नितीन ठाकरे ,राकेश दोंदे,भाग्यश्री ढोमसे,शशी जाधव,सुरेश पाटील,प्रदीप पेशकार आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराच्या सौन्दर्यात आमूलाग्र भर घातली जाणार असल्याचे आश्वासनही यावेळी महाजन यांनी दिले.

सेंट्रल पार्क संदर्भात नाशिककरांपेक्षा मला जास्त माहिती आहे ,कारण यासंदर्भात निर्माण झालेले सर्व वाद सोडविण्यासाठी मी वारंवार मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी जाहीररीत्या जशी आ. सिमा हिरे यांची माफी मागितली त्याचे अनुकरण शहरातील इतर नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी केल्यास नाशकात शांतता नांदेल असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लावला. हे उद्यान लवकरात लवकर पूर्ण करून पुढच्या सत्ताकाळत त्याचे लोकार्पण करायचे असल्याने उद्यानाचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

- Advertisement -

आमदार कोण प्रश्नाला महाजनांकडून सोयिस्कर बगल

आगामी विधानसभा निवडणुकीत केंद्राप्रमाणेच राज्यातही पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री रहातील व मीच पुन्हा नाशिकचा पालकमंत्री राहील असे वक्तव्य महाजन यांनी करताच नाशिक पश्चिम मतदारसंघाचा भावी आमदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी मला एका कानाने कमी ऐकू येत असल्याने तिकडून काय प्रश्न आला हे मी ऐकलेच नाही असे सांगत महाजन यांनी आपल्या हजरजबाबी पणाचे दर्शन घडवीत त्या प्रश्नाला सोयीस्करपणे बगल दिली.

पेलिकन पार्कच्या आठवणींना उजाळा

मोरवाडी येथे असलेल्या १७ एकर जागेवर महापालिकेने खासगीकरणातून पेलिकन पार्कची उभारणी केली होती. त्यासाठी पुणा ॲम्युजमेंट लि. या कंपनीच्या माध्यमातून तेथे पार्क साकारण्यात आले होते. या कंपनीने प्रकल्प उभारणीसाठी एमएसएफसी या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले हेाते. मात्र, कर्जाची परतफेड न झाल्याने संबंधित वित्तीय संस्थेने या जागेचा ताबा घेतला होता. १२ जानेवारी २०१५ रेाजी महापालिकेस दावा संपुष्टात आला असून ही जागा ताब्यात घेण्याचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार तेथे सेंट्रल पार्क उभारण्याची तयारी करून ३१ जानेवारी २०१८ रोजी महासभेवर प्रस्ताव दाखल केला हेाता. या दरम्यान या विषयासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होऊन पेलिकनच्या जागेवर सेंट्रल पार्क उभारण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -