घरमहाराष्ट्रनाशिकजन्मदात्यानेच पाजले मुलांना विष

जन्मदात्यानेच पाजले मुलांना विष

Subscribe

वह्या-पुस्तकांना पैसे मागितल्याचा राग; दोन दिवस पोलीस कोठडी

मुलीने वह्या-पुस्तकांना पैसे मागितले म्हणून पित्याने मुलीसह मुलाला विष पाजल्याची घटना शिंदे गावात घडली. या जन्मदात्यावर नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

पोलिसांंच्या माहितीनुसार, शिंदे गावातील पंढरीनाथ बाबूराव बोराडे (४६) यांच्याकडे मुलगी निकीता हिने वह्या पुस्तकांसाठी एक हजार रुपये मागितले. याचा राग येऊन शुक्रवारी (ता. १९) रात्री साडे दहा वाजता पंढरीनाथने मद्यधुंद अवस्थेत मुलांना मारहाण केली. यावेळी त्याने शेळ्यांच्या गोठ्यात ठेवलेले किटकनाशक बळजबरीने मुलीच्या तोंडात ओतले. यानंतर विरोध करणार्‍या मुलाच्या तोंडातही बळजबरीने औषध ओतले.

- Advertisement -

मुलीला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची तब्बेत गंभीर असल्याने रविवारी तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पंढरीनाथ याला दोन मुले व एक मुलगी असून त्यापैकी सर्वात लहान मुलगा गावातच त्याच्या मावशीकडे गेला होता. अन्य दोघांना पंढरीनाथने विषारी किटकनाशक पाजले. पोलिसांनी मुलांचे  जबाब घेतले असून त्या तक्रारींच्या आधारे पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यास २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -