Saturday, June 5, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक नाशिक-पुणे रेल्वे मार्गची मोजणी अखेर सुरू

नाशिक-पुणे रेल्वे मार्गची मोजणी अखेर सुरू

भुसंपादनासाठी दिशादर्शक पोल लावण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने केलेल्या १६ हजार १३९ कोटींच्या भरीव तरतुदीमुळे नाशिक-नगर-पुणे या २३५ किलोमीटरच्या रेल्वे दुहेरी मार्गाला गती मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर या दोन तालुक्यातील २३ गावांतून हा मार्ग जाणार असून सिन्नर तालुक्यातील नायगाव येथून या मार्गासाठी करावयाच्या भुसंपादनासाठी दिशादर्शक पोल लावण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.

देशातील हा पहिलाच सेमी हायस्पीड मार्ग असून, नाशिक-पुणे अंतर विक्रमी दोन तासांच्या आत गाठता येणे शक्य होणार आहे. शिवाय या तिन्ही जिल्ह्यांचा मोठा विकास होणार आहे. भूसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. महारेलच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी अधिकारयांची नियुक्ती करण्यात आली. नाशिक-नगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांतून १०१ गावांत १३०० हेक्टर भूसपांदन केले जाणार आहे. नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील ९२७ गटातील २२३ हेक्टर जमीन संपादन करण्यात येणार आहे. ज्या गावांमधून हा मार्ग जाणार आहे. त्या मार्गावर दिशादर्शक पोल लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील नायगाव खोर्‍यातील देशवंडी, जायगाव, वडझिरे शिवारातून या प्रक्रियेला सुरुवात झाली.

- Advertisement -

या आधीही विविध प्रकल्पांसाठी तालुक्यातील जमीन संपादित करण्यात आल्याने शेतकरयांनी या भूसंपादनास विरोध दर्शवला आहे.

नाशिकमधील या गावांतून जाणार मार्ग

देवळाली, विहीतगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटपिंप्री, बारगांव पिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडीमजरे, मुसळगांव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दौडी खुर्द, दौडी बु, नांदुरशिंगोटे, चास, नळवाडी.

- Advertisement -