हायस्पीड रेल्वे : नाशिक-पुणे अवघ्या २ तासांत; कामाने घेतली गती

१०१ पैकी ६४ गावांतली मोजणी पूर्ण, सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग २३५ किलोमीटरचा

Pune-Nashik semi high speed railway project should be proposed to the Cabinet said uddhav thackeray

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामानं अखेर गती घेतली असून, या प्रकल्पासाठी मार्गिका मोजण्याचं काम युध्दपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुण्याचा खडतर आणि वेळखावू प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होणार आहे.

आतापर्यंत १०१ पैकी ६४ गावांतल्या मोजणीचं काम पूर्ण झालंय. सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग २३५ किलोमीटरचा असून, या अंतर्गत दोन मार्ग बनवले जातील. या मार्गावरून २०० किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी धावेल. पुण्यासह अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून ही रेल्वे जाईल. मार्गासाठी आतापर्यंत १०१ पैकी ६४ गावांतल्या मोजणीचं काम पूर्ण झालंय. या तिन्ही जिल्हयातून १ हजार ४७० हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. रेल्वेमार्गावर १८ बोगदे आणि ४१ उड्डाणपूल केले जाणार आहेत. या संपूर्ण कामासाठी तब्बल १५०० कोटीचा निधी लागणार आहे.