घरताज्या घडामोडीसंदर्भ सेवा रुग्णालयाला १२ लाखांचा दंड

संदर्भ सेवा रुग्णालयाला १२ लाखांचा दंड

Subscribe

वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ग्राहक न्यायलयाने शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाला १२ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय अधिकार्‍याच्या निष्काळजीपणामुळे ९ मे २०१२ रोजी विश्वास बल्लाल (वय ६९) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णाचे नातेवाईक औरंगाबाद येथील मीना विश्वास बल्लाल व अमोल विश्वास बल्लाल यांनी ग्राहक न्यायालयात दाव दाखल केला होता. यात नुकसान भरपाई म्हणून २५ लाख रूपयांची मागणी मीना बल्लाल व अमोल बल्लाल यांनी केली होती. या खटल्यात संदर्भ सेवा रूग्णालय, डॉ. हिरण, महाराष्ट्र शासन व भल्ला यांचा दुसरा मुलगा अमित भल्ला यांना प्रतिवादी करण्यात आले होते. खटल्याचे कामकाज राज्य ग्राहक न्यायालाचे पी. बी. जोशी व एस. के. काकड यांच्या न्यायालयात चालले. बल्लाल यांचा दावा मान्य करत ग्राहक न्यायालयाने संदर्भ सेवा रूग्णालय व शासनाने बल्लाल यांच्या कुटुंबियांना १० लाख व खटल्याचा खर्च व मानसिक त्रास यासाठी २ लाख असे १२ लाख रूपये देण्याचा आदेश दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -