घरमहाराष्ट्रनाशिकदसक-पंचक येथील गोदावरीवरील ऐतिहासिक दशरथ घाट सुधारणेसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साद

दसक-पंचक येथील गोदावरीवरील ऐतिहासिक दशरथ घाट सुधारणेसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साद

Subscribe

नाशिक : दसक-पंचक येथील गोदावरी नदीकाठी असलेल्या ऐतिहासिक दशरथ घाटाची दुरावस्था झाली असून सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभुमीवर या घाटाचे सुशोभिकरण करण्यात येउन नदी काठावरील दुतोंड्या मारुतीपर्यंत पूल बांधण्याची मागणी शिवसेना पूर्व विधान सभा प्रमुख बाबुराव आढाव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

सिंहस्थ काळात दरवर्षी भाविक नाशिक नगरीत मोठ्या संख्येने येत असतात, गत सिंहस्थ काळात ठिकाणचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने या ठिकाणी भव्य दशरथ घाटाची निर्मिती केली, पण कालांतराने पुन्हा या घाटाकडे महापालिका प्रशासनाचे दुलक्ष झाले आणि दशरथ घाटाचे सौंदर्यीकरण घटत गेले. बाहेरून नाशिक मध्ये येणार्‍या पर्यटकांना तसेच भाविकांना अजूनही दशरथ घाटाविषयी पुरेशी माहिती नसल्याने भाविक या ठिकाणी फिरकत नसल्याची खंत आढाव यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

या भागाचा विकास होऊन भाविकांनी येणार्‍या कुंभमेळ्या दरम्यान पंचवटीतील श्रीराम घाटाप्रमाणेच स्नानासाठी तशीच दर्शनासाठी दशरथ घाटावर गर्दी करावी तशा भाविकांची होणारी गैरसोय दूर करून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.. या नदीपात्रात आढाव यांनी स्वखर्चातून गोदावरी नदीपात्रात या २१ फुटी दुतोंड्या मारुतीची स्थापना केली होती. प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात पिता राजा दशरथ यांचा दशक्रिया विधी याच ठिकाणी पार पडल्याची आख्यायिका आहे.. म्हणून पुरातन आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या अशा या पवित्र स्थळाचे जतन व्हावे अशी स्थानिक दसक – पंचकच्या रहीवाश्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -