घरठाणेयंदाच्या पावसाळ्यात ५२ दिवस भरतीचे, ठाण्यात 'या' भागात पाणी साचण्याची शक्यता

यंदाच्या पावसाळ्यात ५२ दिवस भरतीचे, ठाण्यात ‘या’ भागात पाणी साचण्याची शक्यता

Subscribe

ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात सुमारे ५२ दिवस हे मोठ्या भरतीचे आहेत. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने, पावसाळ्यात महापालिका यंत्रणा सतर्क ठेवली जाणार आहे. नागरिकांनीही या भरतीच्या दिवसाची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून पावसाळ्यातील चार मीटरपेक्षा मोठ्या भरतीचे दिवस जाहीर करण्यात येतात. यंदा जून ते सप्टेंबर या काळात सुमारे ५२ दिवस मोठ्या भरतीचे आहेत, अशी माहिती उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन विभाग) जी.जी. गोदेपूरे यांनी दिली.

- Advertisement -

जून महिन्यात १३ दिवस, जुलै महिन्यात १४ दिवस, ऑगस्ट महिन्यात १४ दिवस, तर सप्टेंबर महिन्यात ११ दिवस असे एकूण ५२ दिवस मोठ्या भरतीचे आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने भरतीचे हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यापैकी सर्वाधिक उंच लाटा या ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० उसळणार असून या लाटांची उंची ४.६० मीटर इतकी असणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या भरतीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यात पुढील दोन दिवसांत हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. केरळात ४ ऐवजी १ जूनलाच मान्सून दाखल होणार आहे. तर ७ जूनपर्यंत मान्सून तळकोकणात पोहोचण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : HSC Result : बारावीच्या निकालात मुंबई विभागातून रायगडची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -