घरमहाराष्ट्रनाशिकमाध्यमिक शिक्षणाधिकारी पूर्णवेळ हवा

माध्यमिक शिक्षणाधिकारी पूर्णवेळ हवा

Subscribe

शिक्षक संघटनांची मागणी; फाईल्स प्रलंबित असल्याच्या तक्रारी

नाशिक : शिक्षणाधिकारी बदलतात मात्र माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार बदलत नसल्याने शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सहायक शिक्षण संचालक पुष्पावती पाटील यांच्याकडे या विभागाचा अतिरीक्त कार्यभार असल्याने त्यांनाही कामाच्या मर्यादा पडतात. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी हवा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी केली आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पुष्पावती पाटील यांनी 24 ऑगस्ट 2021 रोजी पदभार स्विकारला. त्यानंतर पंचायत राज समिती, एसटी समितीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अंदाज समितीच्या दौर्‍यातच त्यांचा एक आठवडा गेला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभा व इतर शासकीय सुट्यांमुळे पावणे दोन महिन्यांच्या काळात त्यांना अवघे 15 ते 20 दिवस कामकाज करता आले. याशिवाय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कामांचा भार असल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागात फाईल्सचा ढिगारा साचत आहे. शिक्षकांची कामे वेळेत होत नसल्याने त्यांना माघारी जावे लागते. अनेक दिवसांपासून प्रकरणे प्रलंबित असल्याने शिक्षकांचे अतोनात नुकसान होत असल्याचे मुख्याध्यापक संघाने म्हटले आहे. त्यामुळे या विभागाला पूर्णवेळ अधिकारी हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी पाटील या सध्या पगार बिलांव्यतिरीक्त इतर फाईल्स निकाली काढत नाहीत. त्रुटी दाखवून फाईल पुन्हा परत पाठविल्या जातात. विधायक शिक्षण संस्थेतील 3९ लोकांच्या सेवा सातत्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. शिक्षक स्वतःच्या चकरा मारून कंटाळले की संघटनेकडे येतात, यात गैर काय आहे.

 

                                   – एस. बी. देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापकसंघ

 

- Advertisement -

माध्यमिक शिक्षणाधिकारी बदलण्यात आल्यानंतरही या विभागाचा कारभार बदलण्याची चिन्हे दिसत नाही. असंख्य फाइल्स विभागात धूळखात पडून असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. संथ गतीने काम सुरू असल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
                     – एस. ए. पाटील, शहर उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

 

माध्यमिक शिक्षणाधिकारी या प्रलंबित फाईल्सबाबत निर्णय घेत नाहीत. वैद्यकीय बील, शिक्षक मान्यता, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक मान्यतेच्या असंख्य फाईल पडून आहेत. त्यांचे गठ्ठे बांधून त्या आता कार्यालयात ठेवल्या जातात, हे शिक्षकांचे दुर्देव आहे. नियमित शिक्षणाधिकारी हवा.
– प्रदीप सांगळे, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

- Advertisement -

 

शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराने मालेगाव त्रस्त गेल्या तीन ते चार वर्षापासून शिक्षकांचे पगाराव्यतिरिक्त अनेक फरक बिल व मेडिकल बिल हे या विभागात पडून असतात. शिक्षकांना नाशिक येथे जाण्यास प्रत्येक वेळेला 400 ते 700 रुपये खर्च येत असतो.
                 – कमलाकर काकळीज, अध्यक्ष, मालेगाव मुख्याध्यापक संघ

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -