घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौर्‍याच्या दिवशी शिवसैनिकांचा मोर्चा

मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौर्‍याच्या दिवशी शिवसैनिकांचा मोर्चा

Subscribe

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या फलकावर शाई फेकल्याच्या वादातून शिवसेनेचे विधानसभा प्रमुख नीलेश (बाळा) कोकणे यांना मारहाण झाली. या प्रकरणातील दोषींना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही, याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शनिवारी (दि.30) पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार आहे. याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे जिल्हा दौर्‍यावर असल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

शिवसेनेचे मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळा कोकणे यांच्यावर १० दिवसांपूर्वी महात्मा गांधीरोडवर हल्ला झाला. शिंदे गटातील समर्थकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. हल्लेखोर हे शिंदे गटाचे असल्याचे असल्यामुळे पोलीस जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. यामुळे पुढील काळात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याची दखल घेवून तीन दिवसांत आरोपींना अटक केली नाही तर शनिवारी (दि.30) पोलीस आयुक्तालयावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच दिवशी मुख्यमंत्री मालेगावी येणार असल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींना अटक करतात की शिवसेना मोर्चा काढते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -