घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेना कार्यकर्ते गोरख खर्जुल यांना जामीन

शिवसेना कार्यकर्ते गोरख खर्जुल यांना जामीन

Subscribe

जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी

नाशिकरोड येथील सिन्नर फाटा भागातील गोरख खर्जुल याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे सुत्रांनी सांगितले. तपासात कसूर केल्याप्रकरणी एक अधिकारी व पाच कर्मचारी निलंबित केल्याने या प्रकरणाची जिल्हाभर चर्चा झाली होती.

याबाबत समजलेली माहिती अशी, नाशिकरोड भागातील शिवसेनेचा कार्यकर्ता गोरख खर्जुल याच्यावर त्यांच्याच इमारतीत राहणा-या एका पोलीस पत्नीने बलात्कार, धमकी, पतीच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप करत नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकणाच्या तपासात कसूर केल्याच्या कारणावरुन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुधीर डोंबरे यांच्यासह ४ पुरुष व एका महिला कर्मचारीस निलंबित केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांच्याकडे आहे. मंगळवारी (दि.९) जिल्हा सत्र न्यायालयात सदर प्रकरणाची सुनावणी सुरु होती, यावेळी न्यायालयाने गोरख खर्जुल यांना जामीन मंजूर केल्याची माहिती खर्जुल यांचे वकिल अॅड. जयदीप वैशंपायन यांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -