घरउत्तर महाराष्ट्रएका डुलकीत 9 लाखांचे शूज गायब

एका डुलकीत 9 लाखांचे शूज गायब

Subscribe

नाशिक : चालकाला डुलकी लागल्याची संधी साधत चोरट्यांनी बाटा कंपनीच्या ९ लाख ६४ हजार रुपयांचे चप्पल व बुटाचे १३७ बॉक्स लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.१८) रात्री १२ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळा जुना जकात नाक्याजवळ घडली. याप्रकरणी बाटा कंपनीचे व्यवस्थापक राधेश्याम मकरंद सिंग (६०,रा.भिवंडी) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (boots, chappal and shoes of reputed Bata company stolen on highway)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथून बाटा कंपनीच्या चप्पल, बुटांचा माल घेऊन निघालेला आयशर ट्रकचा (एम.पी. ४६ एच. ०७६६) चालक अजय गिरवाल (२६), अर्जुन गिरवाल (दोघेही रा. इंदूर) यांनी मुंबई-आग्रा महामार्गा लगतच्या एका पेट्रोल पंपाजवळ ट्रक सोमवारी (दि.१८) रात्री १२ वाजेच्या सुमारास उभा केला. झोप आल्याने दोघेही ट्रकच्या केबिनमध्ये झोपले. काही वेळाने दोघे जागे झाले. ते केबिनमधून खाली उतरून ट्रकच्या पाठीमागे गेले असता त्यांना ट्रकची ताडपत्री उचकटलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी ट्रकमध्ये माल आहे की नाही, याची शहानिशा केली. त्यावेळी त्यांना बुटाचा माल गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी बाटा कंपनीचे व्यवस्थापक व फिर्यादी राधेश्याम मकरंद सिंग यांना माल चोरीला गेल्याची माहिती दिली. सिंग यांनी नाशिकमध्ये येत ट्रकची तपासणी केली. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

- Advertisement -

सिंग यांच्या कंपनीतून सुमारे ८ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा चप्पल-बुटांचा माल घेऊन गिरवाल बंधू नाशिक मार्गे इंदूरला जात होते. शहराच्या वेशी जवळच त्यांना डुलकी आल्याने ट्रक थांबवून विश्रांती केली. दरम्यान, चोरट्यांनी ट्रकमधून माल लंपास केल्याचे सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -