घरक्राइमएसटी कोठेही उभी केल्याची कुरापत काढत टोळक्याकडून चालकाला मारहाण

एसटी कोठेही उभी केल्याची कुरापत काढत टोळक्याकडून चालकाला मारहाण

Subscribe

एसटी कोठेही उभी केल्याची कुरापत काढत टोळक्याने चालकाला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (दि.२७) सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान अमृतधाम चौफुली, मुंबई-आग्रा महामार्ग येथे घडली. याप्रकरणी चालक सुनील सजन शिंदे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हिरावाडी येथील संशयित नवनीत मिथीलेश पटेल (वय २२), अंगत दत्तात्रय देवरे (वय २०), वैभव राजेंद्र कर्डक (वय २९), सचिन ज्ञानेश्वर निकम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सुनील शिंदे एसटी (एमएच ४०- एन ९८३२)मध्ये प्रवाशांना घेवून मुंबई-आग्रा महामार्गावरुन जळगावकडे जात होते. ते अमृतधाम चौफुली येथील सर्व्हिस रोडवर आले. त्यावेळी संशयित चौघेजण दुचाकीवरुन एसटीसमोर आले. त्यांनी एसटीसमोर दुचाकी आडवी उभी केली. एसटी कोठेही उभी करतो का, अशी कुरापत काढून चालक शिंदे यांना एसटीच्या केबिनमधून ओढत बाहेर आणले. त्यांना संशयितांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्हि. व्हि. गिरी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -