राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; नाशिकचे ‘संगीत वात्सल्य’ प्रथम

सतराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत कृपा शैक्षणिक सामाजिक संस्था, नाशिकच्या ‘संगीत वात्सल्य’ नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे. सेक्रेड हार्ट स्कूल, एस.एस.पी. वरप, कल्याण संस्थेचे ‘बदला’ व्दितीय तर व्यक्ती, पुणे संस्थेचे ‘पट्टेरी’ नाटकाने तृतीय पारितोषिक पटकावले.

लातूरमध्ये १७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत २४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षण अरुंधती भालेराव, वीणा लोकूर, शंकर घोरपडे, प्रकाश पारखी, एकनाथ आव्हाड यांनी केले. पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले. नाशिक बालकलावंतांना वैयक्तिक एकूण आठ पारितोषिक जाहीर झाली आहेत.

अंतिम फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे – दिग्दर्शन- प्रथम-कार्तिकेय पाटील (संगीत वात्सल्य), व्दितीय-सुरेश शेलार (बदला), तृतीय-हर्षद ससाणे (थेंबाचे टपाल). प्रकाश योजना– चेतन ढवळे (संगीत वात्सल्य), व्दितीय – शाम चव्हाण – (द गेम), नेपथ्य- प्रथम-बबन कुंभार (द गेम), व्दितीय – अशोक घोलप (प्रायश्चित), रंगभूषा – प्रथम – विजय शिरगावकर (द गेम), व्दितीय – पूनम पाटील (संगीत वात्सल्य), नाट्यलेखन – प्रथम – सुरेश शेलार (बदला), व्दितीय – नितीन गरुड (संगीत वात्सल्य), संगीत दिग्दर्शन – प्रथम – वैभव काळे (संगीत वात्सल्य), व्दितीय – मनिषा पंडीत (वारी), वेशभूषा – प्रथम – सई कुलकर्णी (संगीत वात्सल्य), व्दितीय – महादेव पाटील (द गेम), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक – स्वयंम शिंदे (वानरायण), कृष्णा राजपूरत (आम्हाला पण शाळा पाहिजे), साहिल जाधव (पट्टेरी), शाश्वत उल्हे (खेळण्यातील गेम), इशान जबडे (इन्व्हिजिबल एनिमी), पयोष्णी ठाकूर (थेंबाचे टपाल), यशश्री मुळे (एका वाघिणीची गोष्ट), श्राविका जाधव (आम्ही सावित्रीच्या लेकी), भूमिका घोरपडे (अ..आ..आकलन), दुर्वाक्षी पाटील (संगीत वात्सल्य), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – स्नेहा तराळ (थेंबाचे टपाल), तन्वी खाडीलकर (आम्ही झाड झालो), अनुश्री काळे (वारी), सांची कांबळे (उजगोबा), वैभव दातार (द गेम), जय पवार (संगीत वात्सल्य), सत्यजित शिरोळे (मसणातलं सोनं), तन्मय देशपांडे (टोंब्या ठोंबीची गोष्ट).