काल्पनिक आजारांच्या नावाने होतेय औषधविक्री

नाशिकमधील 'चरक सदन' लोकार्पण सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे टिकास्त्र

rss chief mohan bhagwat
सरसंघचालक मोहन भागवत

भारतीय आयुर्वेद शास्त्र हे अत्यंत प्राचीन असल्याने त्यात सर्वच आजारांचा विचार केलेला आहे. मात्र, आता कोरोनामुळे आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित होताना दिसते आहे. सद्यस्थिती पाहता काल्पनिक आजारांच्या नावाने काही ठराविक औषधांची विक्री सुरू आहे, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी औषध कंपन्या आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडले.

आयुर्वेद व्यासपीठ संघटनेच्या ’चरक भवन’ या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा बुधवारी गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. भागवत बोलत होते. प्राचीन आयुर्वेदशास्त्रात निरामय आरोग्याचा परिपूर्ण विचार केलेला आहे. त्यामुळे आयुर्वेदालाच पुढाकार घेऊन जगभरात सर्व पॅथींमध्ये माहितीच्या आदान-प्रदानासाठी प्रयत्न करावे लागतील.

डॉ. भागवत म्हणाले…

  • आयुर्वेदामुळे उपचारास विलंब लागतो हा गैरसमज
  • सर्व वैद्यकीय पॅथींमध्ये माहितीचे आदान-प्रदान व्हावे
  • सर्वच सरकारी रुग्णालयांची अवस्था वाईट नाही
  • आयुर्वेदाने इलनेस नव्हे तर वेलनेसचा विचार केला
  • अनेकवेळा नाव आणि झेंडा कुठला यावरून वाद होतात, म्हणून लोक एकत्र येत नाहीत