घरमहाराष्ट्रनाशिकआम आदमी चालक-मालक संघटनेच्या लढ्याला यश

आम आदमी चालक-मालक संघटनेच्या लढ्याला यश

Subscribe

नाशिक : उबेर कंपनीकडून चालू असलेली रिक्षाचालकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यश आलेले आहे, आम आदमी रिक्षा युनियनच्या संघटनेच्या मागणीनुसार आरटीओ नाशिककडून रिक्षाभाडे दरवाढ करण्यात आली होती. परंतु उबेर कंपनीकडे रजिस्टर असलेले रिक्षाचालकांना, मुजोर उबेर कंपनी भाडे दरवाढ द्यायला तयार नव्हती. या गोष्टीचा निषेध करत जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात आणि आम आदमी रिक्षा युनियन नाशिकचे जिल्हाध्यक्ष समाधान अहिरे व सचिवनितीन रेवगडे यांच्या पुढाकाराने कंपनीच्या नाशिक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते.

उबेर कंपनीच्या वरिष्ठांपर्यंत बोलणे सुरू होते. मागील ९ दिवसांचा फरक रिक्षा बांधवांना परत मिळावा अशी मागणी करण्यात आली. या सर्व प्रयत्नांना यश आले असून उबेर कंपनीने रिक्षाचालकांना भाडे दरवाढ शासकीय नियमानुसार दिलेली आहे. यावेळी आंदोलनात आम आदमी पार्टीचे राज्य नेते जितेंद्र भावे, अध्यक्ष, समाधान आहिरे, सचिव नितीन रेवगडे, चौधरी रघुनाथ, दत्तात्रय देवरे, रवी कांबळे, रामेश्वर गबाळे, राऊसाहेब जाधव, मोबिन खान, विनोद राठोड, गौरव पवार, मुनीर शेख, संतोष भारंबे, संदीप गोसावी, आसिफ पठाण, सतीश सांगळे, नूतन कोरडे, सूरज पुरोहित सहभागी होते. या निर्णयामुळे रिक्षा बांधवांनी संघटनेचे आभार व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -