घरमहाराष्ट्रतुम्ही फक्त कामं करा, तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना...

तुम्ही फक्त कामं करा, तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Subscribe

पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला न भूतो न भविष्यती विजय मिळेल, असा आशावादही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई – येत्या काळात राज्यात महापालिका निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. तुम्ही फक्त प्रामाणिकपणे कामं करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. ते मंगळवारी रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

हेही वाचा – बाळासाहेब ठाकरें ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहांच्या नावाने चिन्ह मागा; राष्ट्रवादीची टीका

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील जनता सध्याच्या राजकारणाला वैगातली आहे. वैतागून अनेकांनी दसरा मेळावेही पाहिले नाहीत. त्यामुळे मनसेबाबत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा फायदा घ्या. दिवाळीत घरोघरी जाऊन प्रचार करा. सकारात्मक आणि प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी. तसेच सत्ता आल्यावर मी तुम्हालाच पदावर बसवेन, मी कोणतेही पद घेणार नाही, असं आश्वासन देत त्यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाही केली. जनतेसमोर आता एकच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला न भूतो न भविष्यती विजय मिळेल, असा आशावादही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – भाजपाला टार्गेट करत, नेटकऱ्यांनी बाळासाहेबांच्या नावावरून शिंदे गटाला केले ट्रोल

- Advertisement -

दरम्यान, राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांनाही एक महत्त्वाचं केलं होतं. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

हेही वाचा – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून चिन्हासाठी ‘हे’ 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -