घरताज्या घडामोडीपॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पोलीस अधिकारी क्वारंटाईन

पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पोलीस अधिकारी क्वारंटाईन

Subscribe

मुंब्रा येथील पोलीस अधिका-याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काही पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित रुग्णास करोनाचा त्रास झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार करणा-या डाॅक्टर व कर्मचा-यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या डाॅक्टरांचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या रुग्णाच्या संपर्कात आलेलेे आणखी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना बुधवारी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये पोलीस आयुक्तालयातील उच्च पदस्थ अधिकारी व कर्मचारी आहेत.

नाशिकरोड येथील नामांकीत व कायम गर्दीचे ठिकाण असलेल्या खासगी रुग्णालयात पोलीस अधिकारी असलेल्या करोना रुग्णावर उपचार केले गेले होते, त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणारे डाॅक्टरांना क्वारंटाईन केल्याची माहीती डाॅ. धनेश्वर यांनी दिली. दरम्यान बुधवारी (दि.१५) खासगी रुग्णालयातील उपचार करणा-या डाॅक्टरांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने रुग्णालयाचे कर्मचारी व व्यवस्थापनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. तरीही, बुधवारी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -