घरक्राइमपोलीस ठाण्यात 'जमा' वाहने घेऊन जा, अन्यथा लिलाव

पोलीस ठाण्यात ‘जमा’ वाहने घेऊन जा, अन्यथा लिलाव

Subscribe

नवीन नाशिक : पोलीस ठाण्यात बेवारस तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या १४ दुचाकी वाहनांच्या मूळ मालकांनी कागदपत्रासह ओळख पटवून आठ दिवसाच्या आत आपली वाहने घेऊन जावीत, असे आवाहन इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी केले आहे.

इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस स्थितीत, कोम्बिंग ऑपरेशन्, नाकाबंदी पॉईट, वाहन चेकींग मध्ये जमा करण्यात आलेल्या १४ मोटार सायकलच्या मालकांनी अद्यापपावेतो मालकी हक्काबाबत कोणतेही कागदपत्र सादर केलेले नाही. न्यायालयीन प्रक्रिया व वाहनाचे मूळ मालक सापडत नसल्याने सदर वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. आत्तापर्यंत पडून असलेल्या वाहनांचे मालकांनी मालकी हक्क दाखवण्यासाठी कोणतेही कागदपत्रे सादर केलेले नाही. वाहनमालकांनी आठ दिवसाच्या आत आपली वाहने घेऊन जावी अन्यथा न्यायालयाची रितसर परवानगी घेवुन वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बाबळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -