घरक्राइम'कसा' फसला महापालिकेची वेबसाईटवरील डेटा क्रॅकचा डाव

‘कसा’ फसला महापालिकेची वेबसाईटवरील डेटा क्रॅकचा डाव

Subscribe

नाशिक :  हॅकर्सनी महापालिकेच्या वेबसाईटवरील डेटा क्रॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयटी विभागाने २४ तासांत महापालिकेच्या ४३ विभागांचा डाटा वाचवला. ग्लोबल आयपी ड्रेस तपासणीनंतर अमेरिकन हायजॅकर्स असल्याचे लक्षात आले. वेबसाईटवर होणारा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी डाटा अधिक सुरक्षित करण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेच्या एकूण ४३ विभागांमधील कागदपत्रांसह संपूर्ण माहितीचे डिजिटायझेशन सुरू आहे. हा डाटा संकलित करून सुरक्षित करण्यात आला आहे. यासाठी महापालिकेत स्वंतत्र आयटी विभाग निर्माण करण्यात आला. आयटी विभागाच्या माध्यमातून यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जाते. सोबतच महापालिकेच्या वेबसाईटची सुरक्षा करण्यासह ऑनलाइन विभागाच्या तक्रारींचे वर्गीकरण करण्याचे काम आयटी विभागाकडून केले जात आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकन हॅकर्सने संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस पाठवत, संगणकीय यंत्रणा ठप्प केली. मात्र, आयटी विभागाने २४ तास हायजॅकर्सशी हॅकर्सला पळवून लावले.

सरकारी वेबसाईट कॉम्प्युटर इमरजन्सी रिपॉन्स टीम अंतर्गत सलग्न असलेल्या कंपन्यांमार्फत ऑडिट करणे आवश्यक आहे. त्याव्दारे त्रुटी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. हा सायबर हल्ला असून, भारताचा सायबर हल्ला आहे. : तन्मय दीक्षित, सायबरतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -