घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हाधिकाऱ्यांसह १० अधिकारी जिल्ह्याबाहेर

जिल्हाधिकाऱ्यांसह १० अधिकारी जिल्ह्याबाहेर

Subscribe

निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच जिल्ह्यात तीन वर्ष किंवा स्थानिक रहिवास असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. फेब्रुवारी अखेरीस हे आदेश पारित होणार असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांसह तब्बल १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणार आहे. आस्थापना शाखेकडून या संदर्भातील अहवाल तयार केला जात असून, तो लवकरच शासनाला पाठविला जाणार आहे. त्यानंतर बदलीचे आदेश पारित होतील.

या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

- Advertisement -

जिल्हाधिकारी – राधाकृष्णन बी., उपजिल्हाधिकारी – डॉ. शशिकांत मंगरुळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी – प्रज्ञा बढे-मिसाळ, भूसंपादन अधिकारी – दीपमाला चौरे, वासंती माळी, निफाडचे उपविभागीय अधिकारी – महेश पाटील, दिंडोरी उपविभागीय अधिकारी – उदय किसवे, येवला उपविभागीय अधिकारी – भीमराज दराडे, मालेगाव उपविभागीय अधिकारी – अजय मोरे, त्र्यंबक तहसीलदार – महेंद्र पवार, सिन्नर तहसीलदार – नितीन गवळी, कळवण तहसीलदार- कैलास चावडे, मालेगाव तहसीलदार – ज्योती देवरे, येवला तहसीलदार – नरेश बहिरम, धान्य वितरण अधिकारी – अनिल पुरे, निवासी उपजिल्हाधिकारी – रामदास खेडकर.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -