घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजाळपोळ-तोडफोडीच्या 'नाशिक पॅटर्न'मुळे शहरात दहशत; विहितगावात गाड्यांची जाळपोळ

जाळपोळ-तोडफोडीच्या ‘नाशिक पॅटर्न’मुळे शहरात दहशत; विहितगावात गाड्यांची जाळपोळ

Subscribe

नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारी थांबताना दिसत नाहीये. वारंवार शहरात खून, मारामारी, जीवघेणे हल्ले अशा घटना घडतच आहे. त्यातच आता गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्याचा गुन्हेगारांचा नाशिक पॅटर्न पुन्हा तोंड वर काढताना दिसून येतोय. मागील काही दिवसात शहरात अशा पद्धतीच्या ३ ते ४ घटना घडल्या आहे. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिलेला नाही अशी ओरड नागरिक करत आहेत.

दरम्यान, नाशिकरोड भागातील विहितगाव परिसरात असलेल्या रामकृष्ण सोसायटीच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच, याचं परिसरात रस्त्याला बाजूला असलेले पांडुरंग गॅरेज समोर उभ्या असलेल्या पह ते सहा चारचाकी गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे सोसायटीत तसेच परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

वारंवार नाशिक शहरात गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना होत असल्याने पोलिसांच्या गुन्हेगारांवर धाक आहे का नाही असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. मागच्याच काही दिवसांपूर्वी नाशिकच्या अंबड तसेच सिडको परिसरात काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. याच घटनेनंतर पुन्हा एकदा नाशिकच्या विहीतगाव परिसरात गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन युवकांनी या गाड्यांची जाळपोळ केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. जाळपोळ करत असतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे. या संदर्भात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनगर पोलीस करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -