घरमहाराष्ट्रDevendra Fadnvis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट

Devendra Fadnvis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट

Subscribe

Devendra Fadnvis : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याचं मुख्यमंत्री (Chif Minister) जाणार, त्यांचे 16 आमदार अपात्र ठरणार, त्यांना सरकारमधून बाहेर पडावे लागेल, अशा चर्चा सुरू असताना अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दावा केला की, भाजपा एकनाथ शिंदे यांना बाजूला करून आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना मुख्यमंत्री करतील आणि त्यांनी तारीखही सांगितली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnvis) यांनी पुन्हा एकदा सर्व दावे फेटाळताना एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील हे स्पष्ट केले आहे. (Devendra Fadnvis Chief Minister Eknath Shinde Devendra Fadnavis made it clear once again)

हेही वाचा – ठाकरे गटाला नवीन संसदेमध्ये कार्यालय मिळण्याची शक्यता, खासदारांनी घेतली अध्यक्षांची भेट

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. यात वावगं काही नाही. राष्ट्रवादी पक्षातील लोकांना वाटू शकतं अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं भाजपाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. मात्र मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री याठिकाणी होणार नाही. मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे.

हेही वाचा – BMC : मुंबई पालिकेच्या कंत्राटात ‘अनियमितता’, SITकडून तीन प्राथमिक चौकशींची नोंद

- Advertisement -

अजित पवारांना स्पष्ट कल्पना

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार यासंदर्भात अजित पवार आणि माझ्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. महायुतीची ज्यावेळी पूर्ण चर्चा झाली, त्यावेळीही अजित पवार यांना याबाबतची स्पष्टपणे कल्पना देण्यात आली होती आणि ती त्यांनी स्वीकारली आहे. एवढंच नाही तर त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे जे लोकं अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत त्यांना माझं स्पष्टपणे सांगणं आहे की, अशा प्रकारचे संकेत देणं किंवा संभ्रम निर्माण करणं, त्यांनी तत्काळ बंद करावं. कारण महायुती संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम तयार होईल, पण नेत्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

हेही वाचा – Covid Center Scam : सूरज चव्हाणांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

लोक राजकीय भविष्य सांगणारे झाले आहेत

पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर बोलताना फडणीवस म्हणाले की, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, अशाप्रकारची पंतगबाजी सध्या अनेक लोकं करत आहेत. लोक राजकीय भविष्य सांगणारे झाले आहेत. पण त्यांनी कितीही भविष्य सांगून आमच्या युतीत किंवा राज्याच्या जनतेत संभ्रम निर्माण केला तरी दहा, अकरा तारखेला काही होणार नाही. झालंच काही तर आमचा विस्तार होईल. त्याची तारीख ठरायची आहे आणि मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा विस्तार होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -