घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचक्क! मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून आरोपीने मिळवला जामीन

चक्क! मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून आरोपीने मिळवला जामीन

Subscribe

स्वप्नील येवले । नाशिक

विनयभंगसारख्या गुन्ह्यातील आरोपीने मयत व्यक्तीच्या ऐवजी दुसर्‍याच व्यक्तीला उभे करत जामीन मिळवत न्यायालयाची दिशाभूल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा न्यायालयातील विविध गुन्ह्यात ८१ आरोपींना बोगस जामीनदारांमुळे सुटका झाली आहे. याप्रकरणी न्यायालय प्रबंधक यांच्या तक्रार अर्जानुसार एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला असताना एका बोगस जामीनदारामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.

- Advertisement -

दिवाणी व फौजदारी न्यायालय (क्रमांक -१)च्या सहाय्यक अधीक्षक रंजना लक्ष्मण साळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मयूर राजेंद्र हिरावत (वय – २५ वर्षे, रा. हिरावत चाळ, पेठ रोड) याच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणूक, बनावटीकरण, बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे, संगनमत अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर हिरावत याच्याविरुद्ध सन २०२० मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने न्यायालयातून जामीन मिळवताना गणपत भिका जाधव (रा. गंगापूर गाव,नाशिक) हे २ डिसेंबर २०१४ रोजी मयत झालेले असताना त्यांच्या नावाचा सातबारा उतारा, आधारकार्ड १५ डिसेंबर २०२० रोजी न्यायालयात सादर केले. मयत जाधवांच्या ऐवजी एका अनोळखी व्यक्ती अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे यास जाधव असल्याचे भासवून उभे केले आणि स्वतःचा जामीन करून घेतला. असाच बोगस जामीनदार प्रकार एप्रिल महिन्यात उघड झाला होता. त्यावेळी न्यायालय प्रबंधकांच्या निर्देशाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तशाच स्वरूपाचा बोगस जामीनदार प्रकार पुन्हा उघड झाला असल्याने पोलिसांनी आता दोन्ही प्रकरणामध्ये सखोल तपास करत आरोपींसह बोगस जामीनदाराना सहआरोपी करत शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून भविष्यात न्यायालयाची कोणताही आरोपी आणि जामीनदार अशी फसवणूक करण्याची हिम्मत करणार नाही.

या गुन्ह्याबाबत एका अर्जदाराने माहिती मागवत जामीनदाराविषयी माहिती गोळा केली. त्यात सदर व्यक्ती मयत असल्याचे उघड झाले. त्यानंतर अर्जदाराने जिल्हा न्यायालय प्रबंधक यांच्याकडे हा प्रकार निदर्शनास आणून दिला असून, बोगस जामीनदार प्रकरणाला वाचा फोडली आहे. रोजच्या व्यवहारात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी व्यक्तींचे व्हेरिफिकेशन केले जाते. तर बँक खाते, रेशनकार्ड, मोबाईल सिम कार्ड या ठिकाणी व्यक्तीचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी थंब इम्प्रेशन घेतले जाते. परंतु, न्यायालयात विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर करण्यासाठी आजही फक्त कागदपत्रांच्या आधारेच जामीन मिळत असून, सुटका होते. त्यामुळे न्यायालयाने जामीनदारांची पडताळणीसाठी अद्यावत प्रणाली अंमलात आणावी.

  • न्यायालयातील अनेक न्यायाधीशांकडे वर्षानुवर्षे तेच शिपाई काम करत असल्याने आरोपी आणि जामीनदार यांची साखळी तयार झाली आहे.
  •  शनिवार आणि रविवार म्हणजे सुटीच्या न्यायालयात जामिनाकरता बोगस जामीनदार उभे केले जात असल्याची चर्चा आहे.
  • जामीनदारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -