घरमहाराष्ट्रनाशिकआम आदमी रिक्षा युनियनच्या प्रयत्नांमुळे रिक्षा भाडेवाढ जाहीर

आम आदमी रिक्षा युनियनच्या प्रयत्नांमुळे रिक्षा भाडेवाढ जाहीर

Subscribe

नाशिक : शहरात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रिक्षा भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे. ही भाडे दरवाढ फक्त मीटरप्रमाणे भाडे आकारणार्‍या रिक्षाचालकांसाठीच असणार आहे. जितेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी रिक्षा युनियनने नाशिक आरटीओचे मुख्य अधिकारी वासुदेव भगत यांच्याकडे पाठपुरावा केला जात होता. त्यास यश आले आहे.

आम आदमी रिक्षा युनियनची स्थापना नाशिकमध्ये गेल्या चार चार महिन्यांपूर्वी जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन करण्यात आली आहे. या युनियनची स्थापन झाल्यानंतर रिक्षाचालक व मालकबांधवांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या गेल्या. त्यामध्ये प्रामुख्याने रिक्षा पासिंगचा आणि इन्शुरन्सचा वर्षाकाठी जो 14 ते 15 हजार खर्च आहे, तो या संघटनेमार्फत अर्ध्यावर आणण्यास यश आले आहे.

- Advertisement -

आम आदमी रिक्षा युनियनच्या माध्यमातून केवळ पाच हजार रुपयांमध्ये रिक्षा पासिंग इन्शुरन्स केला जातो.
तसेच 2015 नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्षाभाडे दरवाढ झालेली नव्हती ती रिक्षा भाडे दरवाढ खटुआ समितीच्या अहवालानुसार मिळण्यासाठी आम आदमी रिक्षा युनियन नाशिक प्रयत्नशील होती. त्या संदर्भामध्ये जितेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक आरटीओचे मुख्य अधिकारी वासुदेव भगत यांच्याकडे पाठपुरावा केला जात होता. याप्रकरणी भगत यांना आम आदमी रिक्षा युनियनंच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार रिक्षा दरवाढ जाहीर झाली आहे, यासाठी आम आदमी रिक्षा युनियनचे नाशिक शहराचे अध्यक्ष समाधान अहिरे, उपाध्यक्ष गणेश लहामगे, शहर सचिव नितीन रेवगडे आणि संघटक सतिश गायकवाड, पदमाकर आहीरे यांच्यासह नाशिक रिक्षा युनियनचे सर्व सभासद यांनी प्रयत्न केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -