घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या डॉक्टरची सनद होणार रद्द

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या डॉक्टरची सनद होणार रद्द

Subscribe

नाशिक पोलिसांची महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीकडे मागणी

नाशिक शहरात कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या डॉ. रवींद्र श्रीधर मुळक यांची महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडील सनद रद्द करावी, अशी मागणी सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी कुलसचिव, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, महाराष्ट्र यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

डॉ. रवींद्र मुळक यांनी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेने मुंबई ४ फेब्रुवारी २०१० रोजी नोंदणी केली आहे. त्याचे नोंदणी प्रमाणपत्र ५०६५१ आहे. डॉ. मुळक जुना आडगाव नाका येथील सदगुरु रुग्णालयाचा संचालक आहे. तक्रारदार कोरोनाबाधित रुग्णासाठी रेमडेसिवीरचा शोध घेत असताना डॉ. मुळक यांनी तीन रेमडेसिवीर उपलब्ध असून, प्रत्येकी २५ हजार रुपयांना मिळेल, असे डॉ. मुळक यांनी तक्रारदारास सांगितले. प्रत्यक्षात नाशिक शहरात रेमडेसिवीरची किंमत बाराशे रुपये आहे.

- Advertisement -

शहरात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना डॉ. मुळक यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी मोहिते यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. त्यानंतर पंचवटी पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाचे सुरेश देशमुख यांनी डॉ. मुळक यास तीन रेमडेसिवीर विकताना अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. डॉ. मुळक यांनी शासन आदेशाचे उल्लंघन केले असून, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडून प्राप्त झालेल्या नोंदणी प्रमाणपत्रातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे डॉ. मुळक यांची सनद रद्द करण्यात यावी, असे जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे. जाधव यांनी पत्राची प्रत पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागास दिली आहे.

पोलिसांशी साधा संपर्क

- Advertisement -

नाशिक शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना दिसून आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -