घरताज्या घडामोडीपोहायला गेलेल्या तरुणांची मैत्री मृत्यूवेळीही राहिली अतूट

पोहायला गेलेल्या तरुणांची मैत्री मृत्यूवेळीही राहिली अतूट

Subscribe

मालेगाव तालुक्यातील मुंगसे-टाकळी शिवारातील दुर्दैवी घटनेत दोघांचा बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या दोघा मित्रांपैकी एक बुडायला लागल्याचे दिसताच दुसर्‍या मित्राने क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. गावातील दोन जिवलग तरुणांची मैत्री मृत्यूवेळीही अतूट राहिल्याचं पाहून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारी १२.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. राहुल राजेंद्र सागर (१९), प्रसाद खंडेराव सूर्यवंशी (१९, दोघेही रा. मुंगसे) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

- Advertisement -

प्रसाद हा खंडेराव सूर्यवंशी यांचा एकलुता एक मुलगा होता. तर, राहुलला एक भाऊ आहे. प्रसादच्या मृत्यूमुळे सूर्यवंशी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंगसे-टाकळी आणि वाके गावाजवळील कुरण तलावाजवळ तरुणांच्या कुटुंबियांची शेती आहे. रविवारी प्रसाद व राहुल शेतात गेले असता दोघे तलावाकडे गेले. आंघोळीसाठी दोघेही पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने एक बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसर्‍याने उडी घेतली. मात्र, दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी तातडीने मदतकार्य सुरु केले. ग्रामस्थांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढत शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासण त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -