घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदुसऱ्या दिवशी होता निरोप समारंभ; मात्र, त्याआधीच मविप्र संस्थेच्या आदर्श प्राध्यापकांवर काळाचा...

दुसऱ्या दिवशी होता निरोप समारंभ; मात्र, त्याआधीच मविप्र संस्थेच्या आदर्श प्राध्यापकांवर काळाचा घाला

Subscribe

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टो कार, पिकअप गाडी व मोटरसायकल तिहेरी अपघात होऊन अल्टो कारमधील मविप्र संस्थेच्या वणी महाविद्यालयातील एमसीव्हीसी विभागाचे प्राध्यापक रामदास माधव शिंदे (रौळस पिंपरी, ता. निफाड) यांचा जागीच मृत्यू झाला.

वलखेड फाटा येथे सोमवारी (दि.२४) सकाळी ८.३० वा. नाशिक येथून वणी येथे जाणारी अल्टो कार (एमएच १५-सीएम ४४७४) यातील प्रा. रामदास माधव शिंदे वणी येथील ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत होते. ते नाशिक येथून वणीकडे आपल्या अल्टो गाडीने जात असताना वणीहून दिंडोरीकडे जाणारी पिकअप गाडी (एमएच १५-ईजी ५८३०) सागर भास्कर पेलमहाले (आवनखेड) यांची जोरात धडक होऊन पाठीमागून येणारी मोटरसायकल स्प्लेंडरचालक (एमएच १५-डीएच ४९३१) विठ्ठल पंढरीनाथ पागे (आंबेवणी) हे सुद्धा धडकले. असा तिहेरी अपघात झाला.

- Advertisement -

अपघातात प्रा. रामदास शिंदे हे जागीच ठार झाले. त्यांचा आज (दि.२५) वणी येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. त्यात त्यांच्यावर असा काळाने घाला घातला. त्यामुळे सर्व शिक्षकवर्गात हळहळ व्यक्त होत आहे. मोटरसायकल वरील विठ्ठल पागे हे अपघातात जखमी झाले आहेत. वलखेड फाटा येथे टाकण्यात आलेले स्पीड बेकर हे (फायबर) निकृष्ट टाकल्यामुळे ते लवकर खराब होऊन उघडले गेले. येथील स्पीड बेकर हे चांगल्या प्रकारचे टाकण्यात यावे व थोडे दिंडोरी बाजूला पाठीमागे घेण्यात यावे कारण ते लवकर जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे येथे त्वरित चांगल्या प्रतीचे स्पीड ब्रेकर टाकावे अशी मागणी वलखेड येथील ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. सदर अपघाताबाबत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार टी.बी. जाधव, पोलीस नाईक एस.के. कडाळे हे अधिक तपास करीत आहेत.

निरोप समारंभाआधीच निरोप 

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत प्रदीर्घ ज्ञानदान केल्यानंतर प्राध्यापक रामदास शिंदे यांचा कार्यकाळ संपला होता. निवृत्ती नंतर खऱ्या अर्थाने आता स्वतासाठी जगण्याचा काळ सुरू होणार होता. त्यांचा निरोप समारंभासाठी कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, मविप्र संस्थेचे लोकप्रतिनिधी, कर्मचारी मोठे उत्सुक होते. मात्र, निरोप समारंभाच्या आदल्या दिवशीच त्यांनी जगातूनच निरोप घेतल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -